Sudan RSF Attack: सुदानच्या (Sudan) उत्तर दारफुर प्रांतातील अल-फशर (el-Fasher) शहरात रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) या सशस्त्र गटाने नागरिकांवर भीषण अत्याचार केल्याचे वृत्त समोर आले आहे. सुदानच्या सैन्याने शहर सोडल्यानंतर आरएसएफच्या गटाने शहरावर ताबा मिळवला आणि त्यानंतर नागरिकांवर निर्घृण हल्ले सुरू केले.
आरएसएफने गावांमध्ये शिरत महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांची निर्दयपणे हत्या केली. अनेकांना जबरदस्तीने एका रांगेत उभे करून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे माहिती समोर येत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) दिलेल्या माहितीनुसार, अल-फशरमधील संघर्षांमुळे हजारो नागरिकांनी आपली घरे सोडून पलायन केले आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये शेकडो लोक मारले गेले असून, अन्नधान्य आणि औषधसाठा संपल्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.
Sudan RSF Attack: रॅपिड सपोर्ट फोर्सची 2013 साली स्थापना
2013 मध्ये सुदानच्या सरकारने विद्रोही गटांविरुद्ध लढण्यासाठी रॅपिड सपोर्ट फोर्सची स्थापना केली होती. मात्र, कालांतराने हा गट सुदानच्या सुरक्षा व्यवस्थेचा अत्यंत शक्तिशाली भाग बनला आणि अखेरीस सुदानच्या सैन्यालाच आव्हान देऊ लागला. एप्रिल 2023 पासून आरएसएफ आणि सरकारी सैन्य यांच्यातील संघर्ष तीव्र झाला असून देशातील अनेक भागात युद्धाचा भडका उडाला आहे.
Sudan RSF Attack: मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे बळी
यूएनच्या अहवालानुसार, आरएसएफकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा बळी गेला असून, अनेकांवर अत्याचार आणि जातीय हिंसेची प्रकरणेही नोंदली गेली आहेत. अल-फशर शहरातील रुग्णालये, आश्रयस्थाने आणि मदत शिबिरे यांवरही हल्ले झाल्याने मदत पोहोचवणे जवळपास अशक्य झाले आहे.
Sudan RSF Attack: महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांची हत्या
अल-फशर शहरात सुदानच्या सैन्याने शहर सोडल्यानंतर आरएसएफच्या गटाने शहरावर ताबा मिळवला आणि त्यानंतर नागरिकांवर निर्घृण हल्ले सुरू केले. महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांची निर्दयपणे हत्या केली. अनेकांना जबरदस्तीने एका रांगेत उभे करून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने या परिस्थितीला मानवतेविरुद्धचा अपराध (Crimes Against Humanity) ठरवत तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने सुदानमधील नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी तातडीने मदतीचे प्रयत्न करावी, असे आवाहन केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या