Super Earth Type Planets Discovered : आंतरराष्ट्रीय खगोल संशोधकांनी (International Team) पृथ्वीपेक्षा 40 टक्के मोठ्या असलेल्या ग्रहाचा शोध (Super-Earth) लावलाय. हा ग्रह पृथ्वीपासून तब्बल 100 प्रकाशवर्ष (Light-Years)  दूर आहे. संशोधकांनी याला सुपर अर्थ म्हटलेय. या सुपर अर्थवर (Super-Earth) मानवी वस्ती बसवणं शक्य होऊ शकतं. आपल्या सौर मंडळाच्या (Solar System) कोणत्याही अन्य ग्रहांच्या तुलनामध्ये आतापर्यंत पृथ्वीपेक्षा मोठ्या 1,600  सुपर अर्थबाबात माहिती आहे.  हे सुपर अर्थ बर्फाळ ग्रह युरेनस (Uranus) आणि नेपच्यून (Neptune) पेक्षा हल्के आहेत. बेल्जियममधील (Belgium) लिऐज विद्यापीठातील संशोधकांनी सुपर अर्थचा शोध लावलाय.  


पृथ्वीसारख्या ग्रहाचा शोध -  


पृथ्वीसारख्या ग्रहाचा शोध लावण्यासाठी दुर्बिणीची मदत ( Earth-based telescopes ) घेतल्याचं बेल्जियम (Belgium) येथील लिऐज विद्यापीठाच्या (University of Liège) खगोल संशोधकांनी बुधवारी सांगितलं. नासाने शोधलेल्या ग्रहासारखाच हा ग्रह असल्याचेही संशोधकांनी सांगितलं. दरम्यान, यासारखाच एक ग्रह नासाने याच सौर मंडळातून शोधला होता. नासाने ग्रह एलपी 890-9 बी (LP 890-9b) शोधला होता, जो पृथ्वीपेक्षा जवळपास 30 टक्के मोठा आहे. हा ग्रह फक्त 2.7 दिवसांमध्ये सूर्याची परिक्रमा पूर्ण करतो. 


लिऐज विद्यापीठातील संशोधकांनी या ग्रहाला जवळून पाहण्यासाठी चिली (Chile) आणि स्पेनमध्ये (Spain) उच्च सुस्पष्टता कॅमेऱ्यासोबत स्पेकलूज (Search For Habitable Planets EClipsing ULtra-COOl Stars-SPECULOOS) दुर्बिणीचा वापर केला. ही दुर्बिण सौरमंडळात राहणाऱ्या ग्रहांचा शोध घेण्यासाठी वापरली जाते. त्याचवेळी स्टारगेजर्सनी आणखी एका ग्रह एलपी 890-9c (LP 890-9c) याचा शोध लावला. लिऐज विद्यापीठातील संशोधकांनी याला स्पेकलूज -2 सी (SPECULOOS-2c ) नाव दिलेय. हा ग्रह पृथ्वीपेक्षा 40 टक्के मोठा आहे. तसेच सूर्याची परिक्रमा करण्यास या ग्रहाला 8.5 दिवस लागतात.  


सुपर-अर्थवर पाणी असण्याची शक्यता -
संशोधकांनी शोधलेल्या या नव्या ग्रहावर मानवी वस्ती बसवणं शक्य आहे. कारण येथे पाणी असण्याची शक्यता आहे. स्पेनच्या इंन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स ऑफ आंदालुसियाच्या संशोधकाने आणि पेपरच्या मुख्य सह-लेखकांपैकी एक फ्रांसिस्को पॉज़ुएलोस (Francisco Pozuelos) यांनी याबाबत एक परिपत्रक जारी केले आहेत. हा नवीन ग्रह सूर्यापासून 3.7 दशलक्ष मैल दूर आहे. तरीही येथे मानवी वस्ती वसवण्यात येऊ शकते. हा ग्रह मानवी वस्तीसाठी चांगला असू शकतो. पॉज़ुएलोसने म्हटलेय की, " हा ग्रह खूप लवकर परिक्रमा करतो. आपल्या सूर्याभोवती बुधापेक्षा 10 पट कमी अंतरावर आहे, याला मिळणाऱ्या तारकीय किरणोत्सर्गाचे प्रमाण अद्याप कमी आहे. या ग्रहाच्या पृष्ठभागावर द्रव पाण्याचे अस्तित्व असू  शकते, जर त्याला पुरेसे वातावरण असेल. कारण, हा ग्रह ( LP 890-9) सूर्यापेक्षा जवळपास 6.5 पट छोटा आहे. या ग्रहावरील पृष्ठभागाचे तापमान आपल्यापेक्षा निम्मे आहे.