Shubhanshu Shukla Axiom 4: भारतीय  अंतराळवीर शुभांशू शुक्लासह चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर दाखल झाले आहेत. शुभांशू शुक्ला यांनी माझा प्रवास हा देशवासियांचा प्रवास असल्याचं म्हटलं. ड्रॅगन अंतराळ यानाच्या डॉकिंगची प्रक्रिया सुरु आहे. या मिशनचं नेतृत्व भारताचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला करत आहेत. ते आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात 14 दिवस राहणार आहेत. 

एक्सिओम-4 (Ax-4) मिशनमध्ये  भारताचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचं ड्रॅगन कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रासोबत जोडलं गेलं आहे. आता ड्रॅगनच्या डॉकिंगची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची आई डॉकिंगचं थेट प्रक्षेपण पाहून भावूक झाली.

शुभांशू शुक्ला यांची बहीण शुचि मिश्रा यांनी " हा केवळ माझ्यासाठीच नाही तर सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटलं. हा महत्त्वाचा टप्पा आहे. हा टप्पा लवकर पूर्ण व्हावा आण ते सुरक्षित राहावेत यासाठी प्रार्थना करते", असं म्हटलं.  

शुभांशू शुक्ला एक्सिओम-4 मिशनद्वारे स्पेसेक्स ड्रॅगन कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रासोबत जोडलं गेलं आहे. ड्रॅगन कॅप्सूल निश्चित करण्यात आलेल्या वेळेपेक्षा 20 मिनिटं अगोदर डॉक झालं. यानंतर 1 ते 2 तास पडताळणी केली जाईल. त्यानंतर हवेच्या दबावाची स्थिरता याची पुष्टी केली जाईळ. त्यानंतर अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात प्रवेश करतील.  

हे यान 28 हजार किमी / तास वेगानं 418 किमी उंचीवर पृथ्वीसभोवती फिरत आहे. लाँचनंतर 26 तासांचा प्रवास केल्यानंतर अंतराळवीर अवकाश संशोधन केंद्रात दाखल होण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. यासाठी यानानं काही ऑर्बिटल मॅन्यूवर्स केले असून ज्यामुळं ड्रॅगन आयएसएस सोबत अलाईन होईल. 

ड्रॅगन कॅप्सूलची आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रासोबत डॉकिंगची स्वंयचलित प्रक्रिया आहे.  मात्र, शुभांशू आणि कमांडर पेगी व्हिटसन याचं निरीक्षण करतील. 

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी अभिनंदन एक्सिओम-4 डॉकिंगची प्रक्रिया यशस्वी झाली. शुभांशू आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात पाऊल ठेवण्यास तयार असल्याचं ते म्हणाले. शुभांशू शुक्ला यांचा 14 दिवस अवकाश केंद्रात मुक्काम असेल. यामध्ये उत्सुकता आणि आशा दिसून येत असल्याचं म्हटलं. 

पाहा व्हिडिओ :