इस्लामाबाद : पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने सरड्यासारखं रंग बदललं आहे. पाकिस्तान शांतताप्रिय देश असून, भारत-पाकने एकमेंकांविरोधात युद्ध पुकारु नये, असं म्हणणाऱ्या आफ्रिदीने स्वत:च्या वक्तव्यावरुन कोलांटउडी घेतली आहे. भारताला कोणत्याही पद्धतीने उत्तर देण्यासाठी पाकिस्तान तयार असल्याचं आता आफ्रिदीने म्हटलं आहे.


पाकिस्तानमधील पाठाण सीमेवर तैनात आहेत आणि आमचे पठाण भाराताला कोणत्याही पद्धतीने उत्तर देतील, असे शाहिद आफ्रिदीने म्हटलं आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधील भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान चवताळला आहे. राजकीय नेत्यांसह आता सिनेकलाकार आणि क्रिकेटरही भारताविरोधी गरळ ओकू लागले आहेत. शाहिद आफ्रिदी, जावेद मियाँदाद यांनीही भारतावर टीका केली आहे.

आफ्रिदी म्हणाला, "भारताने हे विसरायला नको की, पाकिस्तानी सैनिक सर्व बाजूंनी मजबूत स्थितीत आहेत. पाकिस्तानच्या सीमेवर पठाण सुरक्षा करत आहेत आणि पठाणच सर्वात आधी भारताच्या कोणत्याही कारवाईला उत्तर देण्यासाठी उभे राहतात."

संबंधित बातम्या :

भारताच्या सर्जिकल स्ट्राईकवर शाहिद आफ्रिदी म्हणतो...


भारताला ऑल आऊट करा, सर्जिकल स्ट्राईकनंतर जावेद मियाँदाद बरळला