Saudi Arabia Bus Accident : रमजानच्या (Ramdan) पवित्र महिन्यात सौदी अरेबियातील (Saudi Arabia) एक वाईट बातमी समोर आली आहे. रमजानच्या पहिल्या आठवड्यातच सौदी अरेबियात उमराह करण्यासाठी गेलेल्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 20 मुस्लिम बांधवांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बस डोंगराळ भागातून जात असताना ब्रेक फेल झाल्याने पुलावर आदळली आणि बसला आग लागली. 


मुस्लिम बांधव उमराहसाठी पवित्र शहर मक्का येथे यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला. या अपघातात वीस यात्रेकरूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात सुमारे 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सौदी अरेबियाच्या दक्षिणेकडील असीर राज्यात हा अपघात झाला आहे. 


पाहा व्हिडीओ : अपघातानंतर बसने घेतला पेट






मिळालेल्या माहितीनुसार, असीर प्रांत आणि आभा शहराला जोडणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला. बसचा ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडली. बसमधील सर्व लोक उमराह करण्यासाठी मक्केला जात होते. सौदी नागरी संरक्षण आणि रेड क्रिसेंट प्राधिकरणाच्या पथकांनी अपघातस्थळी पोहोचले आहेत. मृत आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. रमजानच्या महिन्यात मक्का शहर यात्रेकरूंनी गजबजलेलं असतं. यात मोठ्या संख्येने स्थानिक आणि इतर देशांतील अनेक लोक सहभागी होतात.


या अपघातामुळे मुस्लिम बांधवाना मक्का आणि मदिना या इस्लामच्या पवित्र शहरांना भेट देताना येणाऱ्या अडचणी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या आहेत. रमजान महिन्यात लाखो मुस्लिम बांधवांची पावले उमराहसाठी मक्का शहराकडे वळतात. त्यामुळे सौदीतील रस्ते वर्दळीचे होऊन अनेक अपघात घडतात. यादरम्यान सौदी अरेबियातही ट्रॅफिक जामची समस्या उद्भवते. 


रमजानमध्ये अपघाताचं प्रमाण वाढतं


या बस दुर्घटनेत मृत्यू झालेले नागरिक विविध देशांतून आले होते. वर्षाच्या यावेळी म्हणजे रमजानच्या महिन्यात जेव्हा मक्का आणि मदीनाला आनेक यात्रेकरु जातात. या मार्गांवरून दिवसभर मोठ्या संख्येने भाविकांची वाहने ये-जा सुरु असते. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याचा धोका असतो. अनेक वेळा वाहनांच्या देखभालीकडे होणारा निष्काळजीपणा आणि चालकांच्या प्रशिक्षणाचा अभावही अशा अपघातांना कारणीभूत ठरतो.


उमराह म्हणजे काय?


सौदी अरेबियात होणाऱ्या एका तीर्थयात्रेला 'उमराह' असे म्हटले जाते. हा एक प्रकारचा धार्मिक विधी आहे. हज यात्रा आणि उमराहमध्ये फरक आहे. हज यात्रा एका विशेष महिन्यात केली जाते. तर उमराह ही एक छोटी धार्मिक प्रक्रिया आहे. मक्केला कधीही भेट देऊन उमराह करता येतो. उमराहमध्ये यात्रेकरुंना क्षमा मागण्याची संधी मिळते. उमराह करणाऱ्याला पापांपासून मुक्तता मिळते असं म्हटलं जातं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Umrah : शाहरुखने सौदी अरेबियात केलेला 'उमराह' विधी नक्की काय आहे? जाणून घ्या...