Ceasefire Russia Ukraine: रशिया-युक्रेनमध्ये अद्यापही युद्ध सुरू आहे. रशियाकडून मागील 12 दिवस युक्रेनवर हल्ला केले जात आहेत. रशियाकडून सुरू असलेल्या बॉम्ब हल्ले, गोळीबारात सामान्यजणांचे हाल होत आहेत. आता रशियाने पुन्हा एकदा नागरिकांसाठी चार शहरांमध्ये शस्त्रसंधी लागू केली आहे. यामध्ये राजधानी कीव्ह, खारकीव्ह, सुमी आणि मारियूपोल या शहरांचा समावेश आहे. फ्रान्सने केलेल्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे.
रशियाने शनिवारीदेखील दोन शहरांसाठी शस्त्रसंधी लागू केली होती. रशियाच्या संरक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मॉस्कोतील स्थानिक वेळ सकाळी 10 वाजल्यापासून ही शस्त्रसंधी लागू होणार आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये आज तिसऱ्या फेरीतील चर्चा होणार आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की फोनवरून चर्चा करण्याची शक्यता आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आज 12 व्या दिवशीही सुरूच आहे. रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनमधील अनेक शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, शेकडो जीव गमावले आहेत.
रशियाकडून युक्रेनमधील नागरी विमानतळ उद्ध्वस्त
रशियाच्या रॉकेट हल्ल्यात युक्रेनचे विनितसिया येथील नागरी विमानतळ उद्ध्वस्त झाले आहे. याशिवाय रशियन सैन्याने युक्रेनचे दोन अणुप्रकल्प ताब्यात घेतले असून तिसरा प्रकल्प ताब्यात घेण्याचे रशियन सैन्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे. युक्रेनियन सैन्याचे देशाच्या मध्य आणि आग्नेय भागातील प्रमुख शहरांवर नियंत्रण आहे. तर रशियन सैन्याने खार्किव्ह, निकोलायेव, चेर्निहाइव्ह आणि सुमी यांची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला आहे, असा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine War: Russia Ukraine War: अमेरिका आणि पोलंडमध्ये मोठा करार! रशियाविरुद्ध लढा देण्यासाठी युक्रेनला मिळणार लढाऊ विमाने
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धामुळं कच्च्या तेलाचे दर 139 डॉलर प्रति बॅरल पार, 2008 नंतर पहिल्यांदाच गाठली सर्वोच्च पातळी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha