नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील संबंध सध्या चांगले आहेत. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर खनिज तेल खरेदी करत आहे. सध्या दोन्ही देशांमधील संबंध चांगले असले तरी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताची एक विनंती मान्य केली नाही. रशियानं पाकिस्तानला लढाऊ विमानासाठी आवश्यक असलेलं इंजिन देण्याचा निर्णय घेतला आहे. 

पाकिस्तानला JF-17 या लढाऊ विमानासाठी एक विशेष इंजिनाची आवस्यकता आहे.  या लढाऊ विमानाची निर्मिती  चीनकडून केली जाते. मात्र, त्यासाठी रशियाकडील इंजिनची गरज असते. भारतानं रशियाला एक विनंती केली होती. रशियानं पाकिस्तानला त्या विमानाचा पुरवठा करु नये. मात्र, रशियानं भारताची विनंती मान्य केली नाही. 

डिफेन्स सिक्युरिटी आशियाच्या रिपोर्टनुसार, भारतानं रशियाकडे दीर्घकाळापासून आग्रह धरला होता की पाकिस्तानला त्यांनी थेट इंजिन विकू नये. मात्र रशियानं भारताच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केलं. रशियानं आता थेट पाकिस्तानला इंजिन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाकडून त्यांची संरक्षण क्षेत्रातील ताकद वाढवण्यासाठी चीनची मदत घेतली जाते. त्यांची बहुतांश शस्त्र आणि लढाऊ विमानं चीनच्या मदतीनं तयार केली जातात. चीन नंतर रशिया देखील लढाऊ विमानांसाठी पाकिस्तानला मदत करताना पाहयाला मिळतं. 

रशिया एका बाजूला भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करते आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत हात मिळवत आहे. पुतिन यांनी भारताच्या आग्रहाकडे दुर्लक्ष करत हे संकेत दिले की ते डबल गेम खेळत आहेत. JF-17 हे 4.5 जनरेशनचं फायटर जेट आहे. आता ते ब्लॉक III च्या निर्मितीचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे अगोदरच ब्लॉक I आणि ब्लॉक II आहेत.

चीन आणि पाकिस्तानची जवळीक

भारत आणि चीनचे संबंध चढ उतार असे राहिले आहेत.  मात्र, चीन पाकिस्तानला वेळोवेळी मदत करत आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या काळात चीननं पाकिस्तानला मदत केली होती, असा दावा करण्यात आला होता. पाकिस्तानी सैन्य बहुतांश शस्त्र आणि लढाऊ विमानासाठी चीनवर अवलंबून आहे.