Russia Vs Ukraine : रशिया आणि युक्रेनमध्ये घनघोर युद्ध सुरू आहे.  युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केलेल्या दाव्यानुसार जवळपास 800 रशियन सैन्य ठार झाले आहेत. युद्धाच्या पहिल्या दिवशी युक्रेनच्या 137 जणांना प्राण गमवावे लागले. यामध्ये सैन्य  आणि नागरिकांचा समावेश आहे.  रशियन फौजांनी नागरी वस्तींवर गोळीबार केल्याचे युक्रेनच्या लष्कराने म्हटले. त्याशिवाय एअर डिफेन्स सिस्टिमने रशियाचे दोन घातक हल्ले परतवले असल्याचे म्हटले. दोन्ही देशांमध्ये घनघोर युद्ध सुरु आहे. अशात दोन्ही देशांच्या सामर्थ्यांबाबतची चर्चा सुरु झाली आहे. कोणता देश जास्त शक्तीशाली आहे.. याची चर्चा सुरु झाली आहे. युक्रेनने कोणत्याही परिस्थिती न झुकण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये घनघोर युद्ध सुरु आहे.. पाहूयात दोन्ही देशांचे लष्करी सामर्थ किती आहे....

युक्रेनमधील प्रत्येक नागरिकाला लढण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. युक्रेनमधील प्रत्येक नागरिक आपल्या देशासाठी लढण्यासाठी तयार झाला आहे. रशियाच्या तुलनेत युक्रेन छोटासा देश आहे. रशियाची लोकसंख्या 14.6 कोटींपेक्षा जास्त आहे. तर युक्रेनची लोकसंख्या 4.3 कोटी आहे. रशिया आपल्या दैशाच्या सैन्यावर प्रत्येकवर्षी 60 बिलियन अमेरिकन डॉलर इतका पैसा खर्च करतो तर युक्रेन फक्त 12 बिलियन अमेरिकन डॉलर इतका खर्च करते. युक्रेनजवळ सध्या जवळफास दोन लाख 9 हजार सक्रिय सैनिक आहेत. रशियाच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे. रशियाच्या सक्रिय सैनिकांची संख्या 9 लाखांपेक्षा जास्त आहे. दोन्ही देशाच्या राखीव सैन्य दलांमध्येही मोठा फरक दिसून येत आहे. रशियाकडे 20 लाख राखीव सैन्यदल आहे तर युक्रेनकडे 9 लाख इतके राखीव सैन्य दल आहे.

रशिया आणि युक्रेनचं लष्करी सामर्थ्य

  रशिया युक्रेन
लोकसंख्या 14.6 कोटी 4.3 कोटी
डिफेन्स बजेट  60 बिलियन अमेरिकन डॉलर 12 बिलियन अमेरिकन डॉलर
सक्रिय सैन्य 9 लाख 2 लाख 9 हजार
 राखीव सैन्य दल 20 लाख 9 लाख
तोफा 7571 2040
लष्करी वाहने 30122 12303
रणगाडे 12420 2596
सैन्याचे हेलिकॉप्टर्स 544 34
युद्धवाहू विमानं 1511 98

रशियाच्या तुलनेत युक्रेन कमकुवत आहे. पण युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियासमोर गुडघे टेकणार नाही, अशी भूमिका घेत देशातील जनतेला उत्साह दिला आहे. त्यामुळे देशासाठी युक्रेनमधील प्रत्येक नागरिक मैदानावर उतरला आहे. वयोवृद्ध लोकही युद्धाचे प्रशिक्षण घेत आहेत. नाटो आणि अमेरिकाकडून युक्रेनला मदत होत आहे. रशियाविरोधात दोन हात करण्यासाठी विमाने, बंदूका, रणगाडे युक्रेनला पाठवण्यात आले आहेत. नाटो आणि अमेरिकामुळे युक्रेनची ताकद थोड्याप्रमाणात वाढली आहे.

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live