Russia-Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना युक्रेनने (Russia-Ukraine War) रविवारी ड्रोनचा मोठ्या युक्तीने वापर केला आणि रशियाची 41 अत्यंत शक्तिशाली लढाऊ विमाने नष्ट केली. कंटेनरमध्ये ड्रोन भरून ते कंटेनर ट्रकच्या माध्यमातून रशियामध्ये तब्बल 4 हजारांहून अधिक किमी दूरवरील हवाई तळांवर नेण्यात आले आणि त्या ड्रोनचा रिमोटच्या साहाय्याने मारा करण्यात आला. त्यासाठी युक्रेनने वापरलेली रणनीती अतिशय गुप्त आणि धक्कादायक ठरली. 'ऑपरेशन स्पायडर वेब' हे नाव मोहिमेला देण्यात आले होते.
युक्रेनच्या हल्ल्यानंतर आता रशियाने एका जबरदस्त हल्ल्याची तयारी केली आहे. येत्या पाच ते दहा वर्षांत तिसरे महायुद्ध होईल, अशी शक्यता दिसून येत आहे. रशियासोबत वाढलेला तणाव, अमेरिकेचे परराष्ट्र धोरण, अण्वस्त्रांचा धोका ही त्यामागची कारणे आहेत. युद्धात अण्वस्त्रांचा वापर होईल. तिसरे महायुद्ध अधिक विनाशकारी असेल.
रशियाकडे जगातील सर्वात खतरनाक क्षेपणास्र-
रशियाकडे अण्वस्त्र आहेत, ज्यामुळे जग अवघ्या काही मिनिटांत नष्ट होऊ शकते. यातील सर्वात खतरनाक क्षेपणास्र “RS-28 सरमत” आहे, त्यास पाश्चात्य जगताने सैतान-2 असे नाव दिले आहे. हे आंतरखंडीय क्षेपणास्र आहे. या बॅलेस्टीक मिसाईलमध्ये 15-16 अणू बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता आहे. याची रेंज 13,000 ते 18,000 किलोमीटर इतकी प्रचंड आहे. रशियाने क्षेपणास्र “RS-28 सरमत” ने हल्ला केल्यास फक्त एक शहर नाही, तर संपूर्ण पृथ्वी नष्ट होईल.
Russia's Most Deadly Missiles : रशियाची सर्वात घातक क्षेपणास्त्रे -
Kh-47M2 किंझल - हे रशियाच्या सर्वात धोकादायक शस्त्रांपैकी एक आहे. किंझल हे एक हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे जे लढाऊ विमानातून सोडले जाते. त्याची रेंज 2000 किलोमीटर आहे. त्याच वेळी, वेग 12,348 किलोमीटर प्रति तास आहे.
RS-28 सरमत - हे एक आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्याची रेंज 18,000 किलोमीटर आहे. त्यात 10 ते 15 अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे.
अवंगार्ड हायपरसोनिक ग्लाइड व्हेईकल - हे रशियाच्या सर्वात घातक क्षेपणास्त्रांपैकी एक मानले जाते. त्याचा वेग मॅक 27 म्हणजेच सुमारे 32,200 किलोमीटर प्रति तास आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे क्षेपणास्त्र शत्रूच्या रडारमध्ये येत नाही.
9M730 बुरेव्हेस्टनिक - हे अणुऊर्जेवर चालणारे क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ते हजारो किलोमीटर अंतर कापू शकते असा दावा केला जातो. त्याला फ्लाइंग चेर्नोबिल असेही म्हणतात.