Russia-Ukarine crisis : युक्रेनवर (Ukraine) रशियन हल्ल्याचा आज 14 वा दिवस आहे. 14 दिवसांनंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले कमी झालेले नाहीत. दरम्यान, राजधानी कीव्हसह अनेक शहरांमध्ये आता सर्वत्र विध्वंस दिसत आहे. त्याचवेळी, युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, सर्व देश आपल्या लोकांना तेथून सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ऑपरेशन गंगा अंतर्गत भारताने आतापर्यंत हजारो लोकांना युक्रेनमधून बाहेर काढले आहे. त्याचवेळी आता एका पाकिस्तानी विद्यार्थीनीने (Pakistani Woman) युक्रेनमधून सुरक्षित बाहेर पडल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे (PM Narendra Modi) आभार मानले आहेत. 


पाकिस्तानी विद्यार्थीनीचा एक व्हिडिओ समोर
पाकिस्तानी विद्यार्थीनीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती स्वत:ला पाकिस्तानी महिला असल्याचे सांगत आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणते, माझे नाव अस्मा शरीफ आहे. आम्हाला मदत केल्याबद्दल आणि इथून सुरक्षितपणे बाहेर काढल्याबद्दल मी कीवमधील भारतीय दूतावासासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते. पुढे म्हणाली, ती अतिशय कठीण परिस्थितीत अडकली होती , तेव्हा भारतीय अधिकाऱ्यांनी तिला मदत केली आणि तिथून सुखरूप बाहेर काढले, त्यासाठी पंतप्रधान मोदींचे खूप खूप आभार.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्माची भारतीय अधिकाऱ्यांनी सुटका केली असून ती पळून जाण्यासाठी पश्चिम युक्रेनला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अस्मा लवकरच तिच्या घरी पोहोचणार आहे.


 




ऑपरेशन गंगा अंतर्गत 18 हजारांहून अधिक लोकांचे स्थलांतर


युक्रेनमधील वातावरण पाहता भारताने ऑपरेशन गंगा मोहीम सुरू केली, ज्याअंतर्गत आतापर्यंत 18 हजारांहून अधिक लोकांना त्यांच्या मायदेशी आणण्यात आले आहे. यावेळी रोमानियाहून दोन विमानांद्वारे 410 भारतीयांना परत आणले. माहिती देताना मंत्रालयाने सांगितले की, ऑपरेशन गंगा अंतर्गत, 75 विशेष नागरी उड्डाणांद्वारे 15521 भारतीयांना एअरलिफ्ट करण्यात आले आहे, तर 2467 लोकांना भारतीय हवाई दलाच्या 12 विमानांनी परत आणण्यात आले आहे.भारतीय हवाई दलाच्या 12 विमानांनी 2467 लोकांना परत आणले. तसेच आतापर्यंत युक्रेनच्या शेजारील देशांना 32 टनांपेक्षा जास्त मदतीचे साहित्य पाठवण्यात आले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha