Russia Ukraine Crisis : रशिया-युक्रेन युद्ध (Russia-ukraine War) सध्या सुरू आहे. युक्रेन संकटाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे (Netherland PM Mark rutte) यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी भारताकडून शत्रुत्व संपवण्याच्या, संवाद आणि शांततेच्या मार्गावर परतण्याचे आवाहन केले.  त्यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia-Ukraine) सुरू असलेल्या चर्चेचेही स्वागत केले. 


भारतीय नागरिकांच्या प्रगतीबाबत आवाहन


दरम्यान, पीएम मोदी यांनी रुटे यांना संघर्ष क्षेत्रातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याबाबत तसेच बाधित लोकसंख्येसाठी औषधांसह तत्काळ मदत पुरवठ्याच्या स्वरूपात मदतीची माहिती दिली. संवादादरम्यान, पंतप्रधान मोदींनी एप्रिल 2021 मध्ये रुट्टे यांच्यासोबत झालेल्या परिषदेची आठवण करून दिली आणि त्यांचे भारतात लवकरात लवकर स्वागत करण्याची इच्छा व्यक्त केली. याआधी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी स्वतंत्र दीर्घ चर्चा केली होती. युक्रेनवर रशियाचा हल्ला सुरू झाल्यानंतर पुतिन यांच्याशी मोदींची ही तिसरी चर्चा होती. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा मुद्दा दोन्ही नेत्यांच्या चर्चेत प्रमुख मुद्दा होता.






20 लाख लोकांचे युक्रेनमधून स्थलांतर


रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 14वा दिवस आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील अनेक शहरांना मोठा फटका बसला आहे. यासोबतच युक्रेनमध्ये अनेक सामान्य लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत सुमारे 20 लाख लोकांनी देश सोडून पलायन केले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :