मॉस्को : रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरात बॉम्बस्फोट झाला आहे. सेंट पीटर्सबर्गमधल्या एका मेट्रो ट्रेनमध्ये हा स्फोट झाला आहे. यामध्ये दहा प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
दोन स्टेशन्सच्या दरम्यान सबवे धावत असताना हा स्फोट झाला. रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला असून अंदाजे 50 जण जखमी झाले आहेत.
सबवे मेट्रो प्रशासनाने आता या शहरातली अनेक सबवे स्टेशन्स बंद केली असून तपासणी सुरु झाली आहे. स्फोटानंतर मेट्रोची दारं निखळून पडली. प्रत्यक्ष स्फोटाच्या ठिकाणी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
यापूर्वी 2009 मध्येही रशियात मॉस्कोहून सेंट पीटर्सबर्गला जाणाऱ्या हाय स्पीड ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला होता.