Moscow Car Explosion : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन (Vladimir Putin) यांच्या निकटवर्तीयाच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. पुतीन यांचे खास आणि उजवा हात समजले जाणाऱ्या अलेक्झांडर दुगिन (Alexander Dugin) यांची मुलगी दारिया दुगिनची (Daria Dugin) मॉस्कोमध्ये हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या जीवालाही धोका तर नाही ना अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनं किंवा युक्रेननं घेतलेली नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएवरही संशय घेतला जात आहे. त्यामुळे पुतीन यांच्या ब्रेनलाच निशाणा करुन पुतीन यांना जबर धक्का देण्याचा हा प्रयत्न नक्की कोण करतंय? हा प्रश्न आहे.
हल्लेखोरांना दुगिन यांना ठार मारायचं होतं?
रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष अद्यापही कायम आहे. रशिया आणि युक्रेनमधल्या युद्ध सुरु होऊन येत्या 25 तारखेला सहा महिने पूर्ण होतील. पण सहा महिन्यांनंतरही रशियाच्या तुलनेने अत्यंत छोट्या असलेल्या युक्रेननं आपला चिवटपणा सोडलेला नाही. व्लादिमीर पुतीन यांचे राजकीय सल्लागार असलेल्या अलेक्झांडर दुगिन यांची मुलगी डारिया दुगिन हीचा कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. ज्या कारमध्ये स्फोट झाला, ती अलेक्झांडर दुगिन यांची कार होती. त्या कारने अलेक्झांडर हेच प्रवास करणार होते. पण ऐनवेळी त्यांच्या मुलीने आपल्या वडिलांची कार घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि मॉस्कोमध्येच कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात अलेक्झांडर दुगिन यांची मुलगी डारिया हिचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हल्लेखोरांना दुगिन यांनाच ठार मारायचं होतं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अलेक्झांडर दुगिन युक्रेन युद्धाचे मास्टरमाइंड
व्लादिमिर पुतीन यांचा राईट हँड अलेक्झांडर दुगिन (Alexander Dugin) यांना युक्रेन युद्धाचा मास्टरमाइंड म्हटलं जातं. अलेक्झांडर यांचा रशियामध्ये फार प्रभाव आहे. पुतिन यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे. अलेक्झांडर यांच्या मुलीच्या हत्येमागे युक्रेनचा हात असल्याचा आरोप होत आहे. युक्रेनच्या दहशदवाद्यांवर दुगिन यांच्या मुलीची हत्ये केल्याचा आरोप होत आहे.
पुतिन यांच्या सहकाऱ्याच्या मुलीची हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, डारिया डुगिन एका कार्यक्रमावरून परतत असताना मॉस्कोच्या बाहेरील रस्त्यावर तिच्या कारचा अचानक स्फोट झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिचे वडील अलेक्झांडर दुगिन त्याच्यासोबत प्रवास करणार होते, परंतु ते वेगळ्या कारने गेले.