रेडिओ शो सुरु असताना आरजेला प्रसूती वेदना, बाळाच्या जन्माचं थेट प्रसारण
एबीपी माझा वेब टीम | 23 Feb 2018 02:40 PM (IST)
प्रॉक्टोर आणि रेडिओ स्टेशनने मुलाच्या जन्माचं थेट प्रसारण करण्याचा निर्णय घेतला.
सेंट लुईस : अमेरिकेतील एका आरजेने रेडिओ शोदरम्यानच बाळाला जन्म दिला. कॅसीडे प्रॉक्टोर ही अमेरिकेतील सेंट लुईसमध्ये सोमवारी सकाळी तिचा शो करत होती. अचानक तिला प्रसूती वेदना सुरु झाल्या. याचवेळी प्रॉक्टोर आणि रेडिओ स्टेशनने मुलाच्या जन्माचं थेट प्रसारण करण्याचा निर्णय घेतला. रेडिओ स्टेशनने जवळच्याच एका हॉस्पिटलची निवड केली, जेणेकरुन तिथून थेट प्रसारण करता येईल. प्रसूतीचं थेट प्रसारण करण्याचा निर्णय अचानक घेतला गेला, असं प्रॉक्टोरने सांगितलं. जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण श्रोत्यांसोबत शेअर करणं एक वेगळा अनुभव होता, असंही ती म्हणाली. विशेष म्हणजे, श्रोत्यांनी सुचवलेल्या नावानुसारच मुलाचं नाव जेम्सन असं ठेवण्यात आलं. ऑन एअर बाळाला जन्म देणं एक अद्भूत क्षण होता, असं प्रॉक्टोरची सहकारी स्पेंसर ग्रेवने सांगितलं.