Turkey Earthquake :  सोमवारी तुर्की आणि सीरियामध्ये आलेल्या भूकंपाने दोन्ही देश उद्धवस्त झाले आहेत. तुर्कीमध्ये 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला. या भूकंपात अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. जवळपास दोन हजार नागरिकांचा मृत्यू झाला असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दरम्यान भूकंपाची भविष्यवाणी तीन दिवसांपूर्वीच झाली असल्याचा दावा करण्यात येत आहे. ट्वीटर युजर्सने याबाबतचा दावा केला आहे.  भूकंपाचा अभ्यास करणारे  संशोधक फ्रँक हूगरबीट्स यांनी भाकीत होते. त्यांनी केलेल्या ट्वीटनुसार, दक्षिण-मध्य तुर्की, जॉर्डन, सीरिया आणि लेबनॉनच्या आसपासच्या भागात 7.5 तीव्रतेचा भूकंप काही दिवसात येण्याची अंदाज वर्तवला होता. 






ट्वीटमध्ये काय म्हटले?


फ्रँक यांनी 3 फेब्रुवारी रोजी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, "आज नाही तर उद्या, दक्षिण मध्य तुर्की, जॉर्डन, सीरिया आणि लेबनॉनमध्ये 7.5 तीव्रतेचा भूकंप येण्याची शक्यता आहे.''  फ्रँक यांनी वर्तवलेल्या अंदाजाबद्दल त्यांना थोडी शंका होती. पण हा अंदाज खरा ठरला.  फ्रँक यांनी सांगितले की, भूकंपीय क्रियाकलाप आणि ग्रहांच्या भूमितीद्वारे अंदाज लावला. मात्र, ट्विटरवर अनेकांनी त्यांना छद्म वैज्ञानिक म्हटले. एका ट्विटर यूजरने लिहिले की, 'ही व्यक्ती ग्रहांच्या हालचालीवरून भूकंपाचा अंदाज घेत आहे. त्याचे अनेक अंदाज चुकीचे ठरले आहेत. फक्त हेच बरोबर असल्याचे सिद्ध झाले आहे.


भूकंपाचा अंदाज


फ्रँकच्या भविष्यवाणीमुळे भूकंपाची शक्यता वर्तवण्याचा अचूक मार्ग आहे की नाही याविषयी वादाला तोंड फुटले आहे. ReusVisser नावाच्या युजर्सने ट्विटरवर म्हटले की, भूकंपशास्त्रज्ञांनी वेळोवेळी फ्रँकच्या भविष्यवाण्यांना दिशाभूल करणारे आणि अवैज्ञानिक म्हणून खोटे ठरवले आहे. भूकंपाचा अंदाज लावण्याचा कोणताही अचूक मार्ग नाही. त्यांनी 2018 च्या एका बातमीकडे लक्ष वेधले ज्यामध्ये फ्रँकला 'भूकंपाचा अंदाज वर्तवणारा' असे लेबल केले गेले होते आणि भूकंपाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, हा अंदाज बरोबर ठरला नाही.










फ्रँकने व्यक्त केले दु:ख


भूकंपाबाबत व्यक्त केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याबद्दल फ्रँक यांनी दु:ख व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, मध्य तुर्कीत भूकंप आला. या भूकंपग्रस्तासाठी मन दु:खी आहे. या भागात आधीच भूकंप येईल असा अंदाज मी वर्तवला होता. मात्र, फ्रँक हूगरबीट्सच्या या अंदाज वर्तवण्याच्या पद्धतीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :