Ranil Wickremesinghe Resign : श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. "सर्व नागरिकांच्या सुरक्षेसह सर्वपक्षीय सरकारचा मार्ग तयार करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची शिफारस मी आज स्वीकारतो आणि पंतप्रधानपदाचा राजीनामा देतो." असे ट्विट रानिल विक्रमसिघे यांनी केले आहे.










रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा देण्याआधी पंतप्रधान कार्यालयाने याबाबत माहिती दिली होती. "पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी पक्षाच्या नेत्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास आणि सर्वपक्षीय सरकारसाठी मार्ग तयार करण्यास तयार असल्याचे सांगितले होते, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली होती.  


श्रीलंकेत वाढत्या महागाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. संतप्त नागरिकांनी आज राष्ट्रपती भवनाला घेराव घातला होता. त्यानंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपती भवनातून पळ काढला आहे. आंदोलकांनी संसद रजिता सोनारत्नेच्या घरावरही हल्ला केल्याची माहिती समोर आलीय. याआधी 11 मे रोजी तत्क प्रधानमंत्री महिंदा राजपक्ष यांनी त्यांच्या संपूर्ण परिवारासोबत पळ काढला होता. त्यावेळी नागरिकांनी कोलंबोमध्ये राजपक्षेच्या शासकीय घराला घेराव घातला होता. याबरोबरच आज दुपारी रानिल विक्रमसिंघे यांच्या निवास्थानासमोर आंदोलकांनी निदर्शने केली होती. त्यावेळी रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा देण्यास निकार दिला होता. परंतु, आता त्यांनी जानीनामा दिला आहे.