Rahul Gandhi: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपच्या विचारसरणीमध्येच मुळातच भ्याडपणा असल्याचा हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi Colombia Speech) यांनी केला आहे. राहुल यांनी कोलंबियातील ईआयए विद्यापीठात "द फ्युचर इज टुडे" परिषदेत (Rahul Gandhi Future conference) हे विधान केले. राहुल (Rahul Gandhi Latin America tour) दक्षिण अमेरिकन देशांच्या 10 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. कोलंबिया व्यतिरिक्त, राहुल ब्राझील, पेरू आणि चिलीलाही भेट देणार आहेत.

Continues below advertisement

भ्याडपणा या विचारसरणीच्या गाभा

राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या 2023 मध्ये चीनबाबतच्या विधानाचा हवाला देत जोरदार टीका केली. राहुल म्हणाले की, "जर तुम्ही परराष्ट्रमंत्र्यांच्या एका विधानाकडे पाहिले तर ते म्हणाले की चीन आपल्यापेक्षा खूप शक्तिशाली आहे. आपण त्यांच्याशी कसे लढू शकतो? भ्याडपणा या विचारसरणीच्या गाभा आहे. ते दुर्बलांना मारतात आणि शक्तिशालीपासून पळून जातात. हा भाजप-आरएसएसचा स्वभाव आहे." राहुल यांच्या टीकेनंतर भाजपने पलटवार केला आहे. राहुल परदेशात बसून भारताची बदनामी करत आहेत आणि त्यांचा रिमोट कंट्रोल परदेशी लोकांच्या हातात आहे. मोदी आणि भाजपला विरोध करतानाच, ते आता भारत आणि त्याच्या संस्थांना विरोध करायला लागले आहेत, असे म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले की, "भारतात सत्तेत असलेल्यांना प्रत्येक संस्थेला त्यांच्या इच्छेनुसारच काम करायची असते. हे भारताच्या आत्म्याच्या विरुद्ध आहे." विद्यार्थ्यांसोबतच्या प्रश्नोत्तर सत्रादरम्यान त्यांनी सांगितले की लोकशाहीत मतभेदांच्या आवाजांना स्थान मिळाले पाहिजे.

परिषदेत राहुल गांधींसोबत प्रश्नोत्तर सत्र

प्रश्न: जगात सुरू असलेल्या ध्रुवीकरणाबद्दल तुम्हाला काळजी वाटते का?

उत्तर: मी फक्त भारताच्या संदर्भात बोलू शकतो. भारतासारखा मोठा देश नोकऱ्यांसाठी संघर्ष करत आहे. अमेरिकेतील अनेक कंपन्याही बंद पडल्या आहेत. भारतातही अशीच परिस्थिती आहे. आपल्याला चीनकडून शिकण्याची गरज आहे. भारताने चीनकडून उत्पादन कसे वाढवायचे ते शिकले पाहिजे, पण लोकशाही पद्धतीने. भारतालाही अनेक जोखमींना तोंड द्यावे लागेल.

Continues below advertisement

प्रश्न: धोके कोणते आहेत?

उत्तर: भारताच्या लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी धोका आहे; सध्या भारतातील अनेक भागात हे घडत आहे. आपण चीनप्रमाणे लोकांचा आवाज दाबू शकत नाही. भारतातील फक्त 2-3 टक्के लोकांकडे उच्च तंत्रज्ञानाच्या सॉफ्टवेअरची उपलब्धता आहे. हे अत्यंत कमी आहे. भारत केवळ सेवांवर आधारित विकास साध्य करू शकत नाही. स्वतः ट्रम्प यांना केवळ उत्पादनाकडे परतणे कठीण होईल. अमेरिका हा एकेकाळी सर्वात मोठा उत्पादक होता, परंतु आता तो राहिला नाही. सध्या, सर्वात जास्त उत्पादन युनिट असलेला देश आघाडीवर आहे. 21 वे शतक केवळ कारखान्यांवर अवलंबून राहू शकत नाही.

प्रश्न: भारताच्या आरोग्य आणि शिक्षणाबद्दल तुम्ही काय म्हणाल?

उत्तर: भारतातील आरोग्य आणि शिक्षणात एआय मोठी भूमिका बजावणार आहे. भारताच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग खाजगी रुग्णालयांवर अवलंबून आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही मोठ्या गरीब वर्गाला सरकारी सेवा देत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी देश होऊ शकत नाही. यावर आमच्या पक्षाचे विचार एकमत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या