जगभरातील श्रीमंतांची (Rich) यादी नुकतीच जाहीर झाली असून भारतीय उद्योजक (businessman) मुकेश अंबानी यांनी यंदाही आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर, पहिल्यांदाच बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान हाही पहिल्यांदाच अब्जाधिश सुपरस्टारच्या यादीत पोहोचला आहे. आता, दुसरीकडे 31 वर्षीय अरविंद श्रीनिवास हेही नाव बिलेनियर्संच्या यादीत पोहोचले आहे. भारतीय टेक्नो व्यवसायिक अरविंद श्रीनिवास हे देशातील सर्वात तरुण अब्जाधिश बनले आहेत, परप्लेक्सिटी एआय (Perplexity AI) कंपनीचे को-फाउंडर आणि सीईओ अरविंद श्रीनिवास (Arvind shrinivas) यांनी एम3एम हुरुन इंडिया रिच लिस्ट, 2025 मध्ये सर्वात श्रीमंत युवा भारतीय म्हणून आपलं स्थान निर्माण केलं आहे. या यादीनुसार, अरविंद यांची एकूण संपत्ती 21,190 कोटी रुपये एवढी आहे. त्यामुळे, ते भारतातील सर्वात तरुण बिलेनियर ठरले आहेत.
अरविंद यांची कंपनी परप्लेक्सिटी एआय ही जगातील प्रसिद्ध आर्टिफिशियल इंटेलिजेंस मॉडल गूगल जेमिनी (Gemini) आणि ओपनएआय (OpenAI) च्या चॅट जीपीटी (ChatGPT) ला टक्कर देत आहे. गेल्या काही दिवसांत अरविंद यांच्या कंपनीने गूगलच्या क्रोम ब्राउजरला खरेदी करण्याची इच्छा बोलून दाखवली तेव्हा जगभरात खळबळ उडाली होती, एआय आणि आयटी क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या. कंपनीने गूगल क्रोम ब्राउजरच्या खरेदीसाठी तब्बल 34.5 अब्ज डॉलर रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. म्हणजेच, भारतीय चलनानुसार जवळपास 3 लाख कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती. चेन्नई बॉय या नावाने ओळख असलेले अरविंद हे हुशान आणि नामवंत व्यक्ति आहेत. एवढ्या कमी वयात त्यांनी टेक वर्ल्डमध्ये अनेक पुरस्कार आणि यश मिळवत स्वत:चे आणि देशाचे नाव मोठे केले आहे.
कोण आहेत अरविंद श्रीनिवास (Who is arvind shrinivas)
अरविंद श्रीनिवास यांचा जन्म 7 जून 1994 रोजी चेन्नईत झाला. लहानपणापासूनच ते अभ्यासात आणि शाळेतील हुशार विद्यार्थी होते. त्यातच, सुरुवातीपासून त्यांची आवड ही टेक्नॉलॉजी आणि टेक तंत्रज्ञानामध्येच राहिली आहे. यासह, गणित आणि विज्ञान हेच त्यांच्या आवडीचे विषय होते. यासह अरविंद यांना भारत सरकारची नेशनल टॅलेंट सर्च (NTS) ही स्कॉलरशिप देखील मिळाली होती. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अरविंद यांनी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (IIT) मद्रास येथून इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंगमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. बी.टेक आणि एम.टेक हे पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले आहे.
पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले होते, तिथे युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले येथून कंप्यूटर साइंसमध्ये पीएचडी केली आहे. या शैक्षणिक कालावधीत अरविंद यांनी अनेक शोध निबंध लिहिले असून ते देश आणि विदेशांतील प्रसिद्ध एआय संमेलनात प्रकाशित देखील करण्यात आले आहेत. मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर त्यांनी संशोधन केले आहे. या अभ्यासाचा लाभ त्यांना भविष्यात झाला, त्यामुळेच परप्लेक्सिटी एआय ही संस्था त्यांनी स्थापन केले, ते कंपनीचे को-फाउंडर बनले.
एअरटेल कंपनीसोबत डील (Deal with Airtel)
अरविंद यांची परप्लेक्सिटी एआय कंपनी वेगाने पुढे जात असून कंपनीने देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी एअरटेलसोबत मोठी डील केली आहे. त्यानुसार, एअरटेल आपल्या सर्वच सब्सक्राइबरला परप्लेक्सिटी एआय चे प्रो सब्सक्रिप्शन मोफत देत आहे. या ऑफरचा लाखों भारतीय ग्राहकांना फायदा होणार आहेत.
हेही वाचा
Video: मी थोड्या दिवसाचा पाहुणा, मनोज जरांगे पाटलांचं भावनिक भाषण; नारायण गडावर डोळ्यातून अश्रू