Pulitzer Prize 2022 : पत्रकारिता क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या अमेरिकेतील पुलित्झर पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यामध्ये भारतीय पत्रकार अदनान अबिदी, सना इदशाद मट्टू, अमित दवे आणि दानिश सिद्दीकी यांचा सन्मान करण्यात आला आहे. पुलित्झर पुरस्कार पत्रकारिता, पुस्तके, नाटक आणि संगीत क्षेत्रात विशेष कामगिरीसाठी देण्यात येतो. सोमवारी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

पुरस्कार विजेत्यांच्या यादीत अदनान अबिदी (Aadnan Abidi), सना इर्शाद मट्टू (Sanna Irshad), अमित दवे (Amit Dave) या भारतीय पत्रकारांच्या नावांचा समावेश आहे. तर रॉयटर्सचे दिवंगत पत्रकार दानिश सिद्दीकी (Danish Siddiqui) यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुलित्झर पुरस्कार हा अमेरिकेचा पत्रकारितेतील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. 

अदनान अबिदी, सना इर्शाद मट्टू आणि अमित दवे यांच्या कोरोनाच्या काळात भारतात फोटोग्राफीसाठी हा पुरस्कार देण्यात आला. तर रॉयटर्सचे छायाचित्रकार दानिश सिद्दीकी गेल्या वर्षी अफगाणिस्तानमध्ये तालिबानी हल्ल्यात मारले गेले होते.

अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टिंग करत असलेले रॉयटर्सचे पत्रकार दानिश सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुनही तेथील भीषण वास्तव दर्शवणारे अनेक फोटो शेअर केले होते. अफगाणिस्थानातील स्थानिक वृत्तवाहिनीनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, दानिश सिद्दीकी यांची हत्या कांधार प्रांतातील स्पिन बोल्डक परिसरात करण्यात आली. 

 

पत्रकारितेतील विजेत्यांची संपूर्ण यादी

  • ब्रेकिंग न्यूज रिपोर्टिंगसाठी

विजेता : मियामी हेराल्डचे कर्मचारी (फ्लोरिडातील बीचफ्रंट अपार्टमेंट टॉवर्सच्या कोसळल्याचं कव्हरेज) 

  • सार्वजनिक सेवा

विजेता : वॉशिंग्टन पोस्ट (6 जानेवारी 2021 कॅपिटल हिलवरील हल्ला)

  • स्पष्टीकरणात्मक रिपोर्टिंग

विजेते : क्वांटा मासिकाचे कर्मचारी, विशेषत: नताली वोल्चॉवर (वेब स्पेस टेलिस्कोप कसे कार्य करते याबद्दल अहवाल देण्यासाठी पुरस्कार)

  • स्थानिक रिपोर्टिंग

विजेते: बेटर गव्हर्नमेंट असोसिएशनचे मॅडिसन हॉपकिन्स आणि शिकागो ट्रिब्यूनच्या सेसिलिया रेयेस शिकागोच्या अपूर्ण इमारती आणि अग्निसुरक्षेबद्दल अहवाल देण्यासाठी

  • तपास रिपोर्टिंग

विजेता : रेबेका वुलिंग्टनची कोरी जी. टाम्पा बे टाइम्सचे जॉन्सन आणि एली मरे (फ्लोरिडाच्या एकमेव बॅटरी रिसायकलिंग प्लांटमधील अत्यंत विषारी धोका यांचा तपास केल्याबद्दल पुरस्कार)

  • राष्ट्रीय रिपोर्टिंग

विजेता : न्यूयॉर्क टाइम्सचे कर्मचारी

  • आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंग

विजेता : न्यूयॉर्क टाइम्स कर्मचारी

  • वैशिष्ट्य लेखन (फीचर लेखन)

विजेता : अटलांटिकची जेनिफर सीनियर

  • वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रण (फीचर फोटोग्राफी)

विजेते : अदनान अबिदी, सना इर्शाद मट्टू, अमित दवे आणि रॉयटर्सचे दिवंगत दानिश सिद्दीकी, भारतातील कोरोना काळात फोटोंसाठी सन्मानित

  • कॉमेंट्री

विजेता : मेलिंडा हेनबर्गर

  • टीका

विजेता : सलामीशा टिलेट, द न्यूयॉर्क टाइम्स

  • सचित्र अहवाल आणि कॉमेंट्री (इलस्ट्रेटेड रिपोर्टिंग और कॉमेंट्री)

विजेते : फहमिदा अझीम, अँथनी डेल कॉल, जोश अॅडम्स आणि वॉल्ट हिकी

  • ऑडिओ रिपोर्टिंग

विजेता : फ्यूचूरो मीडिया (Futuro Media) आणि पीआरएक्स (PRX) चे कर्मचारी

  • चरित्र

विजेता : चेजिग मी टू माई ग्रेव

  • कविता

विजेता : फ्रँक: सॉनेट्स, डियान स्यूस द्वारे

  • सामान्य गैर-काल्पनिक

विजेता : द इनव्हिजिबल चाइल्ड : पॉव्हर्टी, सर्व्हायव्हल अँड होप इन अ अमेरिकन सिटी, अँड्रिया इलियट

  • संगीत

विजेता : व्हॉइसलेस माससाठी रेवेन चाकॉन

  • कादंबरी

विजेता : नेतन्याहूस, लेखक - जोशुआ कोहेन

  • नाटक

विजेता : फॅट हॅम, जेम्स इजामेसो