VIDEO : जेव्हा पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीवरील चर्चा थेट वादळी कुस्तीत बदलते...
एबीपी माझा वेब टीम | 25 Jun 2019 08:32 AM (IST)
वरिष्ठ पत्रकार ज्या पद्धतीने प्रतिवाद करत होता ते तहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या प्रवक्त्याला रुचलं नाही. त्यामुळे त्याने थेट मारहाणीला सुरुवात केली.
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीवरचं लाईव्ह चर्चासत्र थेट हाणामारीवर पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला आहे. पाकिस्तानच्या तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे ज्येष्ठ नेते मसुर अली सीअल यांनी कराची प्रेस क्लब अध्यक्ष आणि वरिष्ठ पत्रकार इम्तियाज खान फरान यांच्यावर हल्ला केला. हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोमवारी अफताब मुघेरी यांच्या शो दरम्यान हा सर्व प्रकार घडला. वरिष्ठ पत्रकार ज्या पद्धतीने प्रतिवाद करत होता ते तहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या प्रवक्त्याला रुचलं नाही. त्यामुळे त्याने थेट मारहाणीला सुरुवात केली. चर्चासत्रातील इतर पाहुण्यांनी आणि शोच्या संचालकांनी या दोघांना वेगळे केले. या घटनेनंतर पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह तहरिक-ए-इन्साफ पक्षावर भरपूर टीका करण्यात येत आहे. "तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे ज्येष्ठ नेते मसुर अली सीअल यांनी कराची प्रेसक्लब अध्यक्ष इम्तियाज खान फरान यांच्यावर लाईव्ह कार्यक्रमात हल्ला करण्यात आला. हा नवा पाकिस्तान आहे का?” असं मतं पाकिस्तानमधील मुक्त पत्रकार नालया इनायत यांनी व्यक्त केलं आहे.