Prince Philip Death : ब्रिटनच्या महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांचे पती प्रिंस फिलिप यांचं शुक्रवारी निधन झालं. ते 99 वर्षांचे होते. लंडनमधील बकिंघम पॅलेसनं याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. प्रिन्स फिलिप यांना ड्यूक ऑफ एडिनबर्ग असंही म्हटलं जायचं. प्रिंस फिलिप यांच्या निधनानं ब्रिटनमध्ये शोककळा पसरली आहे. ब्रिटनच्या ऐतिहासिक इमारतींवरील ध्वज त्यांच्या सन्मानार्थ खाली उतरवले आहेत. तसेच राष्ट्रीय शोक देखील जाहीर करण्यात आला आहे.
माहितीनुसार मागील 16 मार्च रोजीच त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला होता. प्रिन्स फिलिप यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना 16 फेब्रुवारीला लंडनच्या किंग एडवर्ड सप्तम हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं होतं. 16 मार्च रोजी त्यांना दवाखान्यातून सुट्टी मिळाली होती. मात्र त्यांच्यावर हृदयरोगासंदर्भात उपचार सुरु होते. अशात आज सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
द रॉयल फॅमिलीनं ट्वीट करत त्यांच्या निधनाबाबत माहिती दिली आहे. प्रिन्स फिलिप यांचा जन्म 10 जून 1921 रोजी कोर्फू (Corfu) मध्ये झाला होता.