PM Modi UNGA Speech Live: संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा

PM Modi UNGA Address LIVE: जगाची बदलती सुरक्षा परिस्थिती आणि जागतिक संस्थांमध्ये आवश्यक सुधारणा यासारखे मुद्दे पंतप्रधान मोदींच्या भाषणात ठळकपणे दिसतील.

एबीपी माझा वेबटीम Last Updated: 25 Sep 2021 06:58 PM
अफगाणिस्तानच्या जमिनीचा दहशत पसरवण्यासाठी वापरू होऊ नये : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले की, अफगाणिस्तानची जमीन दहशत आणि दहशतवादी हल्ले पसरवण्यासाठी वापरली जात नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा

चहाच्या दुकानात वडिलांची मदत करणारा मुलाला चौथ्यांदा UNGA ला संबोधित करत आहे : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताच्या लोकशाहीची ही ताकद आहे की एक लहान मूल ज्याने एकदा रेल्वे स्टेशनच्या चहाच्या स्टॉलवर आपल्या वडिलांना मदत केली होती. आज चौथ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून UNGA ला संबोधित करत आहे.

आमची विविधता हे आमच्या मजबूत लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले, मी अशा देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे जी Mother of Democracy आहे. आपल्याकडे हजारो वर्षांपासून लोकशाहीची मोठी परंपरा आहे. या 15 ऑगस्ट रोजी भारताने स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश केला आहे. आपली विविधता हे आपल्या मजबूत लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. एक देश ज्यामध्ये डझनभर भाषा, शेकडो बोलीभाषा, भिन्न जीवनशैली आणि अन्न आहे.

भारत विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. भारताची विविधता त्याच्या लोकशाहीचा पुरावा आहे. देशवासियांची सेवा करताना मी 20 वर्षे पूर्ण केली आहेत. मी आधी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून लोकांची सेवा करत आहे.

कोरोनामुळे जीव गमावलेल्यांना पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली

पंतप्रधान मोदी म्हणाले, "गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जग 100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीला सामोरे जात आहे. मी अशा सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो ज्यांनी अशा भयंकर साथीच्या आजारात आपले प्राण गमावले. अशा कुटुंबियांसोबत माझी संवेदना व्यक्त करतो."

संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशनात पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू

संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशनात पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू 

भारतीय प्रवाश्यांची न्यूयॉर्कमधील हॉटेलच्या बाहेर गर्दी

भारतीय प्रवासी न्यूयॉर्कमधील हॉटेलच्या बाहेर जमले आहेत.. जेथून पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रासाठी रवाना होतील. पंतप्रधान आज संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करणार आहेत.





पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या सत्राला संबोधित करण्यासाठी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात पोहोचले

पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या सत्राला संबोधित करण्यासाठी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात पोहोचले.


 


पार्श्वभूमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) 76 व्या सत्राला संबोधित करतील. ते आज संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या सत्राला संबोधित करतील, कोविड -19 महामारी, दहशतवादाचा मुकाबला करण्याची गरज, हवामान बदल आणि इतर महत्त्वाच्या समस्यांसह जागतिक आव्हानांकडे लक्ष वेधतील. जगाची बदलती सुरक्षा परिस्थिती आणि जागतिक संस्थांमध्ये आवश्यक सुधारणा यासारखे मुद्दे पंतप्रधानांच्या भाषणात ठळकपणे दिसतील. त्याचबरोबर, अफगाणिस्तानमधील सध्याच्या अस्थिरतेची परिस्थिती पाहता, दहशतवादाच्या व्यापक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी प्रभावी धोरणावरही भर दिला जाईल.


गेल्या वर्षी कोविड -19 साथीमुळे महासभेचे अधिवेशन डिजिटल पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पहिल्या द्विपक्षीय बैठकीसाठी आणि शुक्रवारी पहिल्या थेट क्वाड शिखर बैठकीला उपस्थित राहून मोदी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांची भेट घेतल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये पोहोचले. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिडे सुगा यांनीही बिडेन यांनी आयोजित केलेल्या वॉशिंग्टनमधील क्वाड लीडर्स समिटमध्ये भाग घेतला.


पंतप्रधान मोदींनी ट्विट केले, "न्यूयॉर्क शहरात आगमन झाले. 25 तारखेला संध्याकाळी 6.30 वाजता UNGA ला संबोधित करेल. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे सध्याचे सदस्यत्व आता अधिक महत्त्वाचे आहे.


जागतिक संघटनेला संबोधित करणारे ते पहिले जागतिक नेते असतील. पंतप्रधानांचे विमानतळावर भारताचे राजदूत तरणजीत सिंह संधू आणि संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी स्वागत केले. पीएम मोदी यांचा अमेरिका दौरा महासभेत त्यांच्या भाषणाने संपेल. न्यूयॉर्क येथून भारतीय वेळेनुसार, पंतप्रधान आज रात्री 9.15 वाजता भारतासाठी रवाना होतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.