नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक आर्थिक मंच अर्थात डब्ल्यूईएफच्या बैठकीसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाले आहेत. आज सकाळी 9 वाजता रवाना झालेले मोदी संध्याकाळी 6.30 च्या दरम्यान ते दावोसमध्ये दाखल होतील.
पाच दिवस चालणाऱ्या या 48 व्या बैठकीत व्यापार, राजकारण, कला, शिक्षण आणि नागरिकांशी संबंधित अनेकविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. ज्यात भारताकडून जवळपास 130 हून अधिकजण प्रतिनिधित्व करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय अर्थव्यवस्थेची माहिती जगभरातील प्रतिनिधींना देतील.
दरम्यान 20 वर्षांनंतर अशा बैठकीला उपस्थिती लावणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. यापूर्वी 1997 मध्ये देवेगौडा यांनी या बैठकीला हजेरी लावली होती.
सोमवारी मोदी जगभरातल्या कंपन्यांच्या सीईओंसोबत डिनर करणार आहेत, तर मंगळवारी उद्घाटनसत्रात मोदी संबोधित करणार आहेत.
याच कार्यक्रमात बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा सन्मान केला जाणार आहे. शाहरुखसह ऑस्ट्रेलियाची अभिनेत्री केट ब्लेन्चेट आणि संगीतकार एल्टन जॉन यांचाही सन्मान होणार आहे.
मोदींसह भारतीय मंत्र्यांचा ताफा
या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे मंगळवारी डब्ल्यूईएफच्या आंतरराष्ट्रीय व्यापार समुदायाच्या 120 सदस्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ते स्वित्झर्लंडच्या राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांच्यात द्विपक्षीय बैठक होईल.
मोदींसोबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री पियूष गोयल, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, एम जे अकबर आणि जितेंद्र सिंह हे उपस्थित राहणार आहेत.
अंबानी, अदाणींसह मोठे उद्योजक
या बैठकीला जगभरातील विविध कंपन्यांचे सीईओ हजर राहणार आहेत. भारताकडून रिलायन्सचे मुकेश अंबानी, गौतम अदाणी, अजीम प्रेमजी, राहुल बजाज, एन चंद्रशेखरन, चंदा कोचर, उदय कोटक आणि अजय सिंह हे उपस्थित राहतील.
ट्रम समारोप करणार
दरम्यान, जागतिक नेत्यांच्या या बैठकीचा समारोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाने होईल. या बैठकीला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी हे सुद्ध उपस्थित आहेत. मात्र मोदी आणि त्यांच्यात कोणत्याही बैठकीचं नियोजन नाही.
बैठकीला उपस्थित राहणाऱ्या अन्य देशांच्या प्रतिनिधींमध्ये जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल, इटलीचे पंतप्रधान पाउलो गेटिलोअली, फ्रान्सचे अध्यक्ष एमानुएल मॅक्रोन, इंग्लंडचे पंतप्रधआन थेरेसा आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेव यांचा समावेश असेल.
मोदी स्वित्झर्लंडला रवाना, शाहरुख, अंबानी, अदाणीही हजर राहणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jan 2018 10:35 AM (IST)
पाच दिवस चालणाऱ्या या 48 व्या बैठकीत व्यापार, राजकारण, कला, शिक्षण आणि नागरिकांशी संबंधित अनेकविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -