हांगझोऊ : चीनच्या हांगझोऊमध्ये आजपासून जी-20 परिषदेला सुरुवात होणार आहे. परिषदेआधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली. दोघांमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये बनत असलेल्या चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक डोअरबाबत चर्चा झाली. याशिवाय न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपमध्ये (एनएसजी) भारताचं सदसत्व आणि दहशतवादाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली
मोदी आणि जिनपिंग यांची तीन महिन्यातील ही दुसरी भेट आहे. याआधी जून महिन्यात ताश्कंदमधील एका संमेलनात दोघांची भेट झाली होती.
मोदी-जिनपिंग यांच्यात या मुद्द्यांवर चर्चा
- चीन-पाक इकोनॉमिक कॉरिडोअरवर भारताने नाराजी व्यक्त केली. 46 अब्ज डॉलरचा हा कॉरिडोअर पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगित-बाल्तिस्तानमधून जाणार आहे.
- चीनच्या विरोधामुळे भारताला NSG मध्ये सदसत्व मिळलं नाही. या मुद्द्यावरही नव्याने बातचीत झाली.
- मोदींना जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेला संयुक्त राष्ट्रांमार्फत टेरर आउटफिट घोषित करायचं आहे. मात्र चीनने मागच्या वेळेला यामध्ये खो घातला होता.
- जी-20 मध्ये टेरर फायनान्सिंग आणि करचोरी रोखण्यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.