काठमांडू : बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन अर्थात बिम्सटेक संमेलनाला काठमांडूमध्ये सुरुवात झाली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा या संमेलनासाठी काठमांडूमध्ये पोहोचले आहेत.

बंगालच्या खाडीच्या जवळील देश 'बिम्सटेक'चे सदस्य आहेत. दोन वर्षांपूर्वी गोव्यात (भारत) बिम्सटेकचं संमेलन पार पडलं होतं. यंदा नेपाळने या संमेलनाचं आयोजन केले असून, काठमांडूमध्ये आज आणि उद्या हे संमेलन पार पडेल.

बिम्सटेक संमेलनाला आजपासूनच सुरुवात झाली असून, आज रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असतील. तसेच, उद्या म्हणजे 31 ऑगस्ट रोजी सदस्य देशांच्या नेत्यांच्या एकमेकांशी मुलाखती आणि बैठका होतील. त्यानंतर सातही देशाचं एक संयुक्त पत्रक जारी केले जाईल.

'बिम्सटेक' काय आहे?

बांगलादेश, भूटान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड हे सात देश बिम्सटेकचे सदस्य आहेत. या देशांची एकूण लोकसंख्या 1.5 अब्ज असून, जगाच्या लोकसंख्येच्या 21 टक्के आहे. या सात देशांचा जीडीपी 2500 अब्ज डॉलर आहे.