नवी दिल्ली : मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनसाठी रवाना झाले आहेत. चीनमध्ये यावर्षी ब्रिक्स परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जीनपींग यांच्या भेटीकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

डोकलाम सीमाप्रश्नावरून भारत-चीनमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व आहे. डोकलामच्या वादावरुन दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. मात्र भारताने चीनच्या धमक्यांना भीक न घालता सीमेवर सैन्य कायम तैनात ठेवलं.

यानंतर दोन्ही देशांनी वादग्रस्त ठिकाणावरुन जवानांना मागे बोलावत, या वादाला तात्पुरता विराम दिला. मात्र सद्यस्थितीत दोन्ही देशांची वादग्रस्त डोकलामच्या जागेवर गस्त सुरु आहे.

गेल्या वर्षी गोव्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मोदींनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानवर निशाणा साधला होता. चीनमध्येही असंच काहीसं चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. चीन दौऱ्यानंतर मोदी 5-7 सप्टेंबर दरम्यान म्यानमार दौऱ्यावर असतील.

संबंधित बातम्या :

केंद्रात मोठे फेरबदल, दिग्गजांची खाती बदलली!


पियुष गोयल यांची रेल्वेमंत्रिपदी वर्णी लागणार : सूत्र


2019 साठी मोदींची नवी टीम, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार