Philippines Plane Crash : फिलिपिन्समध्ये विमानाचा मोठा अपघात झाला आहे . दक्षिण फिलिपिन्समध्ये लँडिंग करत असताना लष्कराच्या विमानाला अपघात झाल्याचं वृत्त समोर येत आहे. याबाबतची माहिती फिलिपिन्सच्या सशस्त्र दलाच्या प्रमुखांनी दिली आहे. या विमानात 85 लोक प्रवास करत होते.


सी-130 विमान सुलू प्रांतातील जोलो बेटावर उतरण्याचा प्रयत्न करत होतं. यावेळी विमानाचा अपघात झाला. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, या दुर्घटनेनंतर या विमानाला आग लागली. या अपघातातून आत्तापर्यंत 40 जणांना वाचविण्यात यश आले आहे.






या दुर्घटनेवर फिलिपिन्सच्या सशस्त्र दलाच्या प्रमुखांनी, "आम्ही अधिकाधिक लोकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करीत आहोत," अशी प्रतिक्रिया दिली.


या विमानातील अनेक प्रवाशांनी नुकतच मूलभूत लष्करी प्रशिक्षण घेत पदवी संपादन केली. आता हे मुस्लिम-बहुसंख्य प्रदेशात दहशतवादाविरुद्ध लढा देण्याऱ्या संयुक्त टास्क फोर्सचा भाग म्हणून नात होणार होते.


सोबेजाना यांनी पत्रकारांना सांगितले की, "हा अपघात फार दुर्दैवी आहे. विमानाला धावपट्टीवर उतरताच आलं नाही. विमान चालतकाने पुन्हा विमानावर नियंत्रण  मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्यात तो असफल झाला आणि विमान अपघात झाला." तसेच, अपघातात बचावलेल्या किमान 40 लोकांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. तर उर्वरित लोकांना वाचवण्यासाठी सैन्य दल प्रयत्न करीत आहेत.