Passenger Plane and Helicopter Collide in America : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची भीषण धडक झाली आहे. अपघातानंतर प्रवासी विमान पोटोमॅक नदीत पडले. वॉशिंग्टन अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री रोनाल्ड रीगन विमानतळाजवळ हा अपघात झाला.






हे विमान कॅन्सस राज्यातून राजधानी वॉशिंग्टनला येत होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रीगन नॅशनल एअरपोर्ट (DCA) वर स्थानिक वेळेनुसार रात्री 8:50 नंतर विमान अपघाताबाबत (Passenger Plane and Helicopter Collide in America) अनेक कॉल आले. अपघातात सामील असलेले हेलिकॉप्टर यूएस आर्मी ब्लॅकहॉक (एच-60) होते. विमान कंपनीने रात्री 9 नंतर अपघाताची पुष्टी केली.






सध्या विमानतळावर सर्व उड्डाणे आणि लँडिंग थांबवण्यात आले आहे. दोन्हींचे अवशेष सध्या पोटोमॅक नदीत आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बचावकार्य सुरू आहे.


दक्षिण सुदानमध्ये चार्टर्ड विमान कोसळले, 20 जण ठार, मृतात 1 भारतीय


दरम्यान,  दक्षिण सुदानच्या युनिटी स्टेटमध्ये बुधवारी विमान कोसळून 20 जणांचा मृत्यू झाला. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, हे एक छोटे विमान होते ज्यामध्ये दोन पायलटसह 21 लोक होते. हे विमान चीनी तेल कंपनी ग्रेटर पायोनियर ऑपरेटिंग कंपनीने भाड्याने घेतले होते.
युनिटी राज्याचे माहिती मंत्री गटवेच बिपल यांनी सांगितले की, स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता हा अपघात झाला. हे विमान राजधानी जुबाला जात होते. बिपल म्हणाले की, विमानात बसलेले सर्व लोक ग्रेटर पायोनियर ऑपरेटिंग कंपनीचे तेल कर्मचारी होते. मृतांमध्ये दोन चिनी आणि एका भारतीय नागरिकाचा समावेश असल्याचे बिपल यांनी सांगितले.


विमान अपघाताच्या कारणाचा शोध घेतला जात आहे


युनायटेड नेशन्स रेडिओ मिरायाच्या रिपोर्टनुसार, हे विमान दक्षिण सुदानमधील तेलक्षेत्रातून उड्डाण करत होते. विमानात तेल कंपनीशी संबंधित कर्मचारी होते. ही घटना नेमकी कशामुळे घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. त्याच वेळी, अधिकाऱ्यांनी अद्याप पीडितांची ओळख उघड केलेली नाही.


इतर महत्वाच्या बातम्या