Pakistani TikTok star Janat Mirza Video : पहलगाममध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अत्यंत कमालीचे ताणले गेले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून पाकिस्तानी नेत्यांकडून सुद्धा अत्यंत मग्रूर पद्धतीने भाषा वापरली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीमुळे भीतीचं वातावरण आहे. कोणत्याही प्रकारे आपल्यावर हल्ला करू शकतो याची भीती असल्याने पाकिस्तानपासून ते पाकव्याप्त काश्मीरपर्यंत ही दहशत पसरली आहे. पाकिस्तानी नेत्यांकडून पतंगबाजी सुरू असतानाच खेळाडूंना भारताने सोशल मीडियातून दणका दिला आहे. यामध्ये शाहिद आफ्रिदी आणि शोएब अख्तरचं युट्यूब बॅन करण्यात आलं आहे. 

या सर्व पार्श्वभूमीवर आता आणखी एक पाकिस्तानमधील व्हायरल व्हिडिओ समोर आला असून यामध्ये पाकमधील प्रसिद्ध टिकटॉक स्टार जन्नत मिर्झाने भारत पाकिस्तान संबंधांवर पाकिस्तानी लष्कराला समर्थन देण्यास नकार दिला. जन्नत मिर्झाचा हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. जन्नतला भारत पाकिस्तानमधील युद्धजन्य स्थितीमुळे प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता या विषयावर मौन बाळगणं पसंत केलं. 

जन्नतचा भारतामध्ये सुद्धा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तिच्या सौंदर्याची चर्चा पाकिस्तान नव्हे, तर भारतामध्ये सुद्धा होत असते. त्यामुळे सोशल लोकप्रियतेला कुठेही धक्का पोहोचू नये म्हणून पाकिस्तानी कलाकारांकडून सध्या काळजीपूर्वक वर्तन केलं जात आहे.   दुसरीकडे, पाकिस्तानची हानिया आमिर असो किंवा आयेजा खान, प्रत्येक सुंदरीच्या सौंदर्याचे लाखो चाहते वेडे आहेत. यामध्ये जन्नत मिर्झाही आहे. पाकिस्तानी टिकटॉक स्टार जन्नत मिर्झा कायम चर्चेत असते. 22 वर्षीय जन्नत ही पहिली पाकिस्तानी टिकटॉक स्टार आहे जिचे 1 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. पण तिच्यावरील बंदीनंतर ही स्टार खूप प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. इन्स्टाग्रामवरही जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत. जन्नतचे इंस्टाग्रामवर 61 लाख फॉलोअर्स देखील आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या