India Vs Pakistan War: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारताने लष्करी आणि राजनैतिक पातळीवर कठोर पावले उचलली आहेत. त्याच वेळी, पाकिस्तानचा प्रतिसाद केवळ परमाणु धमक्या, सोशल मीडियावरील दिशाभूल करणारा प्रचार आणि राजनैतिक वक्तव्ये यांच्यापुरता मर्यादित राहिल्याचं चित्र आहे. पाकिस्तानचे सैन्य आधीच धोरणात्मकदृष्ट्या एकाकी पडले आहे. पाकिस्तानचे सैन्य आधीच धोरणात्मकदृष्ट्या एकाकी पडल्याची चर्चा आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि अंतर्गतरित्या विभाजित झाल्याचंही बोललं जातंय. कोणत्याही प्रकारच्या लष्करी संघर्षाला हाताळण्याच्या स्थितीत ते नाहीत. असं असूनही, ते सोशल मीडिया आणि काही देशांतर्गत मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे खोट्या लष्करी तयारीचा प्रचार करत आहे.
अलिकडेच, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर नियंत्रण रेषेवरील आघाडीच्या रेषांची पाहणी करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, जो सोशल मीडियावर 2022 मधील जुने फुटेज असल्याचे सांगत फेटाळून लावण्यात आला होता. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने याला जाणीवपूर्वक केलेला प्रचार म्हटले आहे. भारताने याबाबत बोलताना म्हटलं, पाकिस्तानमधील जनतेचा कमी होत चाललेला विश्वास परत मिळवण्यासाठी हा केवळ एक केविलवाणा प्रयत्न आहे.
29 एप्रिल रोजी पाकिस्तान हवाई दलाने प्रसिद्ध केलेल्या एका प्रमोशनल व्हिडिओमध्ये रशियाच्या एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली, स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेट आणि अगदी कॉल ऑफ ड्यूटी व्हिडिओ गेममधील व्हिडिओ दाखवण्यात आले होते. पाकिस्तानकडे यापैकी काहीही नाही. या हास्यास्पद व्हिडिओला सोशल मिडिया युजरनी X वरील ट्रोल केले आणि त्यानंतर त्यांना त्या पोस्टखालील कमेंट सेक्शन बंद करावं लागलं.
पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
हलगाम हल्ल्याच्या आठ दिवसांनंतर, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत या हल्ल्याचा निषेध केला. तसेच, पाकिस्तान युद्धाला सुरुवात करणार नाही, पण भारताने आमच्यावर हल्ला केला, तर आम्ही त्याचा संपूर्ण शक्तीनिशी सामना करू आणि दुप्पट गतीने प्रत्युत्तर देऊ, अशी पोकळ धमकी त्यांनी दिली. एकीकडे पाकिस्तानचे वरिष्ठ मंत्री अणुहल्ल्याची धमकी देतात, तर दुसरीकडे पंतप्रधान शाहबाज शरीफ निष्पक्ष चौकशीचे आवाहन करतात. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यास अणुहल्ल्याचा पर्याय समोर असल्याची थेट धमकी दिली. त्याच वेळी, भारताकडून संभाव्य लष्करी कारवाईची भीती असल्याने पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने आंतरराष्ट्रीय समुदायाला मध्यस्थीचे आवाहन केले. परंतु अमेरिका, ब्रिटन आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसारख्या प्रमुख देशांनी कोणत्याही थेट हस्तक्षेपाला नकार दिला आहे आणि फक्त संयम राखण्याचा सल्ला दिला आहे.
पाकिस्तानी सैन्याचे घसरतंय मनोबल
टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी सैन्यातही मनोबल घसरल्याच्या बातम्या आल्या आहेत. व्हायरल झालेल्या एका पत्रात मोठ्या संख्येने लोक सैन्यातून राजीनामा मागत असल्याचे सांगितले आहे. मात्र, याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, हे वृत्त देखील पाकिस्तानने नाकारलेलेही नाही. त्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले.
पाकिस्तानचे लष्करी बजेट
पाकिस्तानचे लष्करी बजेट फक्त 7.6 अब्ज डॉलर्सवर अडकले आहे, जे भारताच्या तुलनेत खूपच नगण्य आहे. तज्ज्ञांच्या मते, नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या सक्तीच्या लष्करी तैनातीचा खर्च दररोज 15-30 लाख डॉलर्स इतका होत आहे. हा त्यांच्या कमकुवत परकीय चलन साठ्याला आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का आहे.
भारताची विचारपूर्वक आखलेली रणनीती
भारताने या बाबतीत ठोस आणि संयमी पावले उचलली आहेत. याबाबत बैठका, चर्चा, विचारविनीयम भारतात सुरू असताना मात्र, दुसरीकडे पाकिस्तानचा प्रचार, अणुहल्ल्याची धमकी आणि अंतर्गत असंतोष यामुळे त्याची स्थिती सतत कमकुवत होत आहे.