भारतीय समजून पाकिस्तानी लोकांनी त्यांच्याच पायलटला मारले
एबीपी माझा वेब टीम | 02 Mar 2019 03:02 PM (IST)
पाकिस्तामध्ये तिथल्या स्थानिकांनी भारतीय पायलट समजून स्वतःच्याच पायलटला ठेचून मारल्याची घटना घडली आहे. शाहाजुद्दिन असे या दुर्दैवी पाकिस्तानी पायलटचे नाव आहे.
ISLAMABAD, PAKISTAN - AUGUST 14: A fighter jet of SoloTurk performs to mark the Pakistan's 70th Independence Day anniversary in Islamabad, Pakistan on August 14, 2017. Pakistani Air Forces organised the largest air show which showcased aerobatic teams from Turkey and Saudi Arabia as well. (Photo by Muhammed Reza/Anadolu Agency/Getty Images)
इस्लामाबाद : पाकिस्तामध्ये तिथल्या स्थानिकांनी भारतीय पायलट समजून स्वतःच्याच पायलटला ठेचून मारल्याची घटना घडली आहे. शाहाजुद्दिन असे या दुर्दैवी पाकिस्तानी पायलटचे नाव आहे. पाकिस्तानच्या नौशेरा परिसरात शाहाजुद्दीनचे F-16 जेट क्रॅश झाले. त्यानंतर शाहजुद्दीन पॅराशुटच्या सहाय्याने नौशेरा सेक्टरमध्ये उतरले. त्यानंतर तिथल्या स्थानिकांनी शाहजुद्दीन याला भारतीय पायलट समजून जबर मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी हवाई दलाचे पायलट शाहजुद्दीन एफ 16 विमानाने उड्डाण करत होता. त्याचे जेट क्रॅश झाल्यानंतर पॅराशूटच्या सहाय्याने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये त्याने लॅन्डिंग केले. शाहजुद्दीन खाली उतरण्याआधीच जखमी झाला होते. तसेच त्याचा गणवेशदेखील फाटला होता. यावेळी तिथल्या लोकांचा गैरसज झाला की, शाहजुद्दीन भारतीय पायलट असावा. त्यामुळे लोकांनी त्याला मारहाण सुरु केली. या मारहाणीत तो जखमी झाल्याने शाहजुद्दीन याचा मृत्यू झाला. VIDEO दरम्यान, पाकिस्तानी जेटला परतवून लावताना भारतीय पायलट अभिनंदन वर्थमनदेखील पाकिस्तानात पोहोचले होते. तिथे त्यांचे जेट क्रॅश झाले. पॅराशुटच्या सहाय्याने अभिनंदन पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरले. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले. तीन दिवस पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर काल (शुक्रवारी )अभिनंदन यांना मायदेशी धाडण्यात आले. पाकिस्तानच्या गोळीबारात चार भारतीय जवान शहीद | काश्मीर | एबीपी माझा