नवी दिल्ली: कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीदरम्यान पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी माध्यमांनी लायकी दाखवून दिली.


भेटीनंतर पाकिस्तानी माध्यमांनी कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला अपमानास्पद प्रश्न विचारले.

आपके पतीने हजारो बेगुनाह पाकिस्तानीयों के खून से होली खेली, इसपर आप क्या कहेंगी?  अपने कातील बेटे से मिलने के बाद आपके क्या जजबात हैं?

अशा प्रकारचे प्रश्न पाकिस्तानी माध्यमांच्या प्रतिनिधींनी कुलभूषण यांच्या कुटुंबियांना विचारले.

कुलभूषण जाधव हे भारतीय नागरिक असून, भारतीय नौदलाचे माजी अधिकारी आहेत. हेरगिरीच्या आरोपाखाली कुलभूषण सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत.


21 महिन्यानंतर आई-लेकाची भेट
हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव 25 डिसेंबरला आई आणि पत्नीला भेटले. परंतु पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात या भेटीसाठी खास काचेच्या भिंतींची इंटरकॉम रुम तयार करण्यात आली होती.

कुलभूषण जाधव यांना काचेच्या एका बाजूला बसवलं होतं, तर दुसऱ्या बाजूला त्यांची आई आणि पत्नी बसली होती. यांच्या मध्ये असलेल्या काचेच्या भिंतीमधून पाकिस्तानचा अमानवीय चेहरा समोर आला.

कुलभूषण यांची आई-पत्नीशी बोलणं झालं पण ते ही फोनच्या माध्यमातून.

पाकिस्तान सरकारनेभेटी दरम्यान, कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्र, बांगड्या आणि टिकली काढायला लावली होती. तसंच त्यांना आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत बोलण्यास मज्जाव करण्यात आला होता.

कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतातून त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचे सांगलीतील असून, सध्या मुंबईत वास्तव्यास आहे.

कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.

जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे.

‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.

संबंधित बातम्या

टिकली-बांगड्या उतरवल्या, मराठीतही बोलू दिलं नाही

कान, डोक्यावर जखमांचे निशाण, पाकिस्तानकडून जाधवांचा छळ?

कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीशी भेट, मात्र थेट बोलणं नाहीच!