नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विधानाचा आधार घेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. केजरीवाल म्हणाले की, पाकिस्तानला मोदींपेक्षा चांगला पंतप्रधान मिळू शकत नाही. मोदींनी आयएसआयला वायुसेनेच्या पठाणकोट येथील कॅम्पवर हल्ला करु दिला, नरेंद्र मोदी हे पाकिस्तानचा अजेंडा लागू करत आहेत.
केजरीवाल यांनी 14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. केजरीवाल म्हणाले की, या घटना निवडणूकीपूर्वी घडवल्या गेल्या. तसेच मोदी आणि इम्रान खान यांच्यात काय शिजतंय? असा सवालही केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणूक जिंकली, तर भारतासोबत शांततेसाठी चर्चा करण्याची चांगली संधी मिळेल. इम्रान खान यांच्या याच विधानाचा वापर करत केजरीवाल यांनी मोदींवर टीका केली आहे.
केजरीवाल म्हणाले की, चार आठवड्यांपूर्वी दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता इम्रान खान मोदींना पंतप्रधान होताना पाहू इच्छितात. ते असं का करत आहेत? आता लोकांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात प्रश्न विचारणे सुरु केले आहे. इम्रान खान यांनी लोकसभा निवडणुकीच्या दोन महिने अगोदर पुलवामा हल्ला का घडवून आणला? असे अनेक सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केले आहेत.
पाकिस्तानला नरेंद्र मोदींशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकत नाही : अरविंद केजरीवाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Apr 2019 10:50 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विधानाचा आधार घेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -