Pakistan Railway Station Blast बलुचिस्तान: पाकिस्तान मधील बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर आज सकाळी (9 नोव्हेंबर 2024) रोजी बॉम्बस्फोट झाला. या घटनेत 24 लोकांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोटाचा व्हिडीओ समोर आला आहे. स्पुतनिक इंडिया या एक्स खात्यावरुन यासंदर्भातील व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हल्लेखोरांना पाकिस्तान लष्करावर हल्ला करायचा होता, अशी प्राथमिक माहिती आहे.
बलूच लिबरेशन आर्मीनं घेतली जबबादारी
क्वेटा रेल्वे स्टेशनवर झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी बलूच लिबरेशन आर्मीनं घेतली आहे. बॉम्बस्फोट झाल्यानंतर बॉम्बरोधक पथक आणि स्थानिक पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं होतं. पीटीआयच्या वृत्तानुसार बलूच लिबरेशन आर्मीनं या घटनेची जबाबदारी घेतली आहे. हा स्फोट रेल्वेच्या बुकिंग कार्यालयात झाला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बॉम्बस्फोटामुळं प्लॅटफॉर्म देखील दुर्घटनाग्रस्त झाला आहे. या स्फोटाचा आवाज शहरातील विविध भागात ऐकला गेला. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या हल्ल्याच्या घटनेचा निषेध केला आहे. सामान्य आणि निर्दोष नागरिकांना लक्ष्य करुन भयानक कृत्य करण्यात आल्याचं ते म्हणाले. त्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
24 लोकांचा मृत्यू
सरफराज बुगती यांनी या हल्ल्याबाबत बोलताना दहशतवाद्यांकडून सामान्य नागरिक, मजूर, महिला आणि मुलांना लक्ष्य केलं जात आहे. बुगती म्हणाले की आम्ही हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणार आहोत. बलुचिस्तानचे पोलीस महानिरीक्षक मौज्जम जाह अन्सारी यांनी बॉम्बस्फोटात 24 जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार आतापर्यंत हल्लेखोरांचं लक्ष्य इन्फंट्री स्कूलचे सैन्य कर्मचारी होते. जखमींची स्थिती गंभीर असल्याची माहिती देखील आहे. क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट झाला तेव्हा पेशावरकडे निघालेली ट्रेन रेल्वे स्टेशनवरुन रवाना होणार होती. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 24 जणांपैकी 14 लष्कराचे जवान असल्याची माहिती आहे.
बॉम्बस्फोटाचा व्हिडीओ
इतर बातम्या :