डोनाल्ड ट्रम्प आता पाकिस्तानवरही बंदी घालणार?
एबीपी माझा वेब टीम | 30 Jan 2017 11:53 AM (IST)
वॉशिंग्टन: अमेरिकेने बंदी घातलेल्या सात देशांच्या यादीमध्ये आता आठव्या देशाच्या रुपात पाकिस्तानचाही समावेश होण्याची शक्यता आहे. व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबतचे संकेत दिले आहेत. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण, इराक, लीबिया, सूदान, येमेन, सीरिया आणि सोमालिया या देशातल्या नागरिकांना पुढच्या 90 दिवसांसाठी अमेरिकेत येण्यासाठी बंदी घातली आहे. अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बंदी महत्त्वाची असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. बंदी घातलेल्या देशांमध्ये कट्टर इस्लामिक देशांचा समावेश आहे. शिवाय हे देश अतिरेक्यांचे तळ आहेत. त्यामुळे पाकिस्तानही आता या देशांच्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता व्हाईट हाऊसचे 'चीफ ऑफ स्टाफ रीन्स प्रिबस' यांनी एका न्यूज़ चॅनलच्या मुलाखतीत सांगितलं. संबंधित बातम्या मुस्लीमबहुल देशातील निर्वासितांना अमेरिकेत नो एंट्री : ट्रम्प ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणावर फेसबुक, गुगल, अॅपलचं टीकास्त्र