कराची : पाकिस्तानमध्ये कराती येथील पाकिस्तान स्टॉक एक्सेंचवर दहशतवादी हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्यात चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या हल्ल्यात पाच नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. तसेच सुरक्षा रक्षक आणि नागरिकांसह अनेक जण जखमी झाले आहेत.


स्थानिक पत्रकारांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवाद्यांनी सर्वात आधी कराची स्टॉक एक्सेंजच्या इमारतीच्या मेन गेटवर ग्रेनेड हल्ला केला होता आणि त्यानंतर गोळीबार सुरु केला. आतापर्यंत एकूण किती दहशतवादी होते हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र दावा करण्यात येत आहे की, चाह दहशतवादी होते आणि त्या सर्वांचा खात्मा झालेला आहे.


पाहा व्हिडीओ : पाकिस्तानातील कराची स्टॉक एक्सचेंवर दहशतवादी हल्ला



सिंध रेंजरच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे की, 'हल्ल्या केलेल्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून क्लियरेंज ऑपरेशन सुरु आहे.' तसेच पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'दहशतवादी ज्या गाडीतून आले होते, ती गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.'



दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या दोन्ही बाजूंनी फायरिंग सुरु आहे. दहशतवाद्यांनी सर्वात आधी कराची स्टॉक एक्सेंजच्या इमारतीच्या मेन गेटवर ग्रेनेड हल्ला केला होता आणि त्यानंतर गोळीबार सुरु केला. दहशतवादी हल्यात दोन लोकांची जीव गेल्याची माहिती मिळत आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी स्विकरली नाही.


महत्त्वाच्या बातम्या : 


आता चीनकडूनही भारतीय निर्यातीच्या कस्टम क्लियरन्समध्ये अडथळे


चीनने स्वतःची जबाबदारी ओळखून एलएसीच्या त्यांच्याकडील बाजूला जावं : भारतीय राजदूत विक्रम मिसरी


चीनवर नजर ठेवण्यासाठी अमेरिका आपलं सैन्य आशियात दाखल करणार?