Pakistan Floods : पाकिस्तान (Pakistan) महापुरानं वेढा घातला आहे. पाकिस्तान सध्या आतापर्यंतच्या सर्वात भीषण पुराचा (Flood in Pakistan) सामना करत आहे. पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे महापूर आला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. या पुरामुळे आतापर्यंत लहान मुलांसह 1000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या पुरामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. पाकिस्तानमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनाही ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. 


पाकिस्तानमध्ये पुरामुळे झालेल्या जीवित आणि साधनसंपत्तीच्या नुकसानावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत धीर दिला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपल्या विशिष्ट गुणांमुळे पाकिस्तानी जनता या संकटातून बाहेर पडेल आणि पुन्हा एकदा जनजीवन सुव्यवस्थित होईल अशी आशा आहे, असे ट्वीट पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केले आहे. 






पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
पाकिस्तानमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “पाकिस्तानमध्ये  पुरामुळे झालेला विध्वंस पाहून दु:ख झाले. या नैसर्गिक आपत्तीत बळी पडलेल्या, जखमी झालेल्या तसेच  पुरामुळे बाधित झालेल्यांच्या कुटुंबीयांप्रति मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि परिस्थिती लवकर पूर्वपदावर येईल अशी आशा व्यक्त करतो.” 






भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती आहे, 10 मुद्द्यांमध्ये जाणून घ्या.


1.  मुसळधार पाऊस आणि पूर यामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने राष्ट्रीय आणीबाणी (National Emergency) लागू केली आहे.









3. पाऊस आणि महापुरामुळे चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानला 4 अब्ज डॉलरहून अधिक नुकसान झालं आहे. हे नुकसान अजूनही वाढू शकतं.


4. महापुरामुळे पाकिस्तानचं एकूण नुकसान सुमारे 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते.


5. पाकिस्तानमध्ये पाऊस आणि पुरामुळे कापूस पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. कापसाची पिकं पूर्णपणे नष्ट झाली आहेत.


6. पाकिस्तानी मीडियाच्या रिपोर्टनुसार, देशाला कापड निर्यात करावी लागू शकते. यामध्ये एक अब्ज डॉलर्सचं नुकसानही सहन करावं लागू शकतं.


7. देशातील परिस्थिती पाहता पाकिस्तानला 2.6 अब्ज डॉलर किमतीचा कापूस आणि 90 दशलक्ष डॉलर किमतीचा गहू आयात करावा लागण्याची शक्यता आहे.


8. मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये महापुरामध्ये आतापर्यंत 1000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय सुमारे पाच लाख जनावरंही दगावली आहेत.


9. सिंध प्रांतातील 23 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बहुतेक भाग पुराच्या पाण्यानं वेढला आहे.


10. पाकिस्तानमधील 'डॉन' वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार एक हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 343 मुलांचा समावेश आहे.