नवी दिल्ली: पाकिस्तानाच्या लाहोरमधील विधानसभेजवळ बाॅम्बस्फोट झाला असून, यामध्ये उच्च दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या स्फोटात अनेकजण जखमीही झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


लाहोर विधानसभेच्या गेटजवळ हा स्फोट झाला असून, या स्फोटवेळी घटना स्थळाजवळ औषधे उत्पादक संघटनेची प्रदर्शने सुरु होती. त्यावेळीच एका गाडीत स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज जवळपास एक किलोमीटरपर्यंत ऐकू येईल, इतका मोठा असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.

या स्फोटात निवृत्त पोलीस प्रमुख मोबीन अहमद आणि वरिष्ठ पोलीस अधिक्षक जाहिद गोंडाल यांचा मृत्यू झाला आहे. विरोध प्रदर्शनादरम्यान हा हल्ला झाल्याने, हा आत्मघातकी हल्ला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.