Continues below advertisement

नवी दिल्ली : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवर सुरु असलेला संघर्ष थांबला आहे. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारच्या दाव्यानुसार पाकिस्तानच्या विनंतीवर आणि पाठपुराव्यानंतर दोन्ही देशांमध्ये 48 तासांसाठी अस्थायी शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरु होता. दोन्ही देशांच्या सैनिकांचा या संघर्षात मृत्यू झाला होता. या घटनांमुळं दोन्ही देशांमधील संबंध तणावाचे बनले होते.

जबी उल्लाह मुजाहिद यांची माहिती

अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी एक्स वर पोस्ट करत म्हटलं की पाकिस्तानच्या विनंतीनंतर अफगाणिस्ताननं शस्त्रसंधी जाहीर केली. भारतीय प्रमाणवेळेननसार साडे सहा वाजता शस्त्रसंधी लागू करण्यात आली. अफगाणिस्तानच्या सर्व सुरक्षा दलांना शस्त्रसंधीच्या दरम्यान कोणताही हल्ला करु नये किंवा सीमा पार करु नये असे आदेश दिले गेले आहेत.

Continues below advertisement

पाकिस्तानचा सारखाच दावा

पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाच्या दाव्यानुसार शस्त्रसंधी दोन्ही देशांच्या सहमतीनं आणि अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारच्या विनंतीवर करण्यात आला. शस्त्रसंधीच्या काळात दोन्ही देश चर्चेतून प्रश्न सोडवण्याबाबत सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील.

सीमेवर तणाव

पाकिस्ताननं कंधार आणि काबूलमध्ये तालिबानच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले होते. पाकिस्तान सैन्याच्या मिडिया विंग, इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स नुसार हा हल्ला अफगाणिस्ताकडून झालेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरासाठी करण्यात आला. अफगाणिस्ताननं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या 23 सैनिकांचा मृत्यू झाला तर 29 सैनिक जखमी झाले होते.

पीटीव्ही न्यूज नुसार पाकिस्तान सैन्यानं कंधारमध्ये तालिबानचे बटालियन मुख्यालय नंबर 4 आणि 8 , सीमा ब्रिगेड नंबर 5 आणि 6 उद्धवस्त केलं. रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार नागिरकांना इजा होणार नाही अशा ठिकाणी हल्ले करण्यात आले. ज्याला अफगाणिस्तानकडून दुजोरा देण्यात आला. पाकिस्ताननं केलेली ही कारवाई सीमेवर गेल्या आठवड्यात झालेल्या संघर्षानंतर करण्यात आली. ISPR अनुसार तालिबाननं स्पिन बोल्डक भागातील चार ठिकाणांवर हलेले केले. जे पाकिस्तानच्या सैन्यानं रोखलं होतं. ज्यामध्ये 15-20 जणांचा मृत्यू झाला आहे.

अफगाणिस्ताननं पाकिस्तानकडून करण्यात आलेले आरोप फेटाळण्यात आले आहेत. पाकिस्ताननं बदला म्हणून आमच्या भूभागावर हल्ले केले. दहशतवादी पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर करतात हा आरोप देखील अफगाणिस्ताननं फेटाळला आहे.