Corona Vaccine : ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी विकसित केलेल्या लसमुळे कोरोनामुळे होणारे मृत्यू तर रोखले जाणार आहेत. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग देखील कमी होतो. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, कोणत्याही कोरोना लसीमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी होते.


कोरोना संक्रमणावरील परिणामाचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी दर आठवड्यात अभ्यासात सहभागी असलेल्या लोकांची तपासणी केली. त्यांना असे आढळले की लस घेतल्यानंतर एखाद्याला कोरोनाची लागण झाली तरी तो व्हायरस पसरवू शकत नाही. ही लस घेतल्यानंतर लोकांमध्ये पॉझिटिव्ह स्वॅब येण्याच्या प्रमाणात 67 टक्के घट झाली आहे. ऑक्सफोर्ड आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या संशोधकांना असे आढळले की ही लस जवळजवळ दोन तृतियांश संक्रमण कमी करू शकते. अद्याप संशोधनाच्या निष्कर्षांचे तज्ञांकडून पुनरावलोकन केले गेलेले नाही.


ब्रिटिश आरोग्य सचिवांच्या मते निकाल उत्साहवर्धक


ब्रिटिश आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी बुधवारी निकालाचे कौतुक केले. ते म्हणाले की, आम्हाला आता माहित आहे की ऑक्सफोर्ड लस संक्रमण देखील कमी करते आणि यामुळे आपल्या सर्वांना या साथीच्या रोगातून मुक्त होण्यास मदत होईल. प्रत्येकाने असा विश्वास ठेवला पाहिजे की हे केवळ आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठीच नाही तर कोरोना व्हायरसपासून इतरांपर्यंत पसरवण्यापासून बचाव देखील करते.


लसीचा एक डोस 76 टक्के प्रभावी


ऑक्सफोर्ड आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या संशोधकांना असेही आढळले की कोविड 19 रोखण्यासाठी लसीचा एक डोस 76 टक्के प्रभावी आहे. पहिला डोस दिल्यानंतर तीन महिन्यांनंतर डेटा मोजला गेला. तीन आठवड्यांच्या सुरुवातीच्या कालावधीचा यात समावेश नाही. हे निकाल ब्रिटन आणि इतर देशांतील जास्तीत जास्त लोकांना प्रथम डोस देण्याच्या रणनीतीत मदत करू शकतात.