लंडन : दहशतवादी ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन याने लग्न केलं आहे. अमेरिकेवर 9/11 हल्ल्यासाठी विमानाचं अपहरण करणाऱ्या मोहम्मद अट्टाच्या मुलीशी ओसामाच्या मुलाने लग्न केल्याचं समोर आलं आहे.


ब्रिटीश वृत्तपत्र 'द गार्डियन'ने हमजाने अट्टाच्या मुलीशी विवाह केल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा सात वर्षापूर्वी अमेरिकेन सैन्याने खात्मा केला होता.


अट्टा इजिप्तचा नागरिक आणि अमेरिकेतील एअरलाईन्स प्लाईट-11चा पायलट होता. अट्टानेच सर्वात आधी विमानाचं अपहरण करुन अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला होता. या घटनेत विमानातील एकूण 92 प्रवाशांसह जवळपास 1600 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.


ओसामाचा सावत्र भाऊ अहमद आणि हसन अट्टाच्या माध्यमातून मिळालेल्या वृत्तानुसार, हमजा अलकायदामध्ये वरिष्ठ पदावर सक्रिय आहे. लादेनच्या हत्येचा बदला घेणे हा त्याचा मुख्य उद्देश असल्याचेही समोर येत आहे.


अमेरिकेच्या सैन्याने 2011मध्ये मे महिन्यात अफगाणिस्तानच्या एबटाबादमधील परिसरात घुसून लादेनला ठार मारलं होतं. लादेन तेथे एका भल्यामोठ्या घरात आपल्या तीन बायकांसोबत राहत होता. या हल्ल्यात लादेनचा भाऊ खालिदही मारला गेला होता.


हमजाने अट्टाच्या मुलीश लग्न केलं आहे असं आम्ही ऐकलं आहे. सध्या हमजा कुठे राहतो याबद्दल आम्हाला ठोस माहिती नाही. मात्र तो अफगाणिस्तानमध्ये असू शकतो, असं अहमद अट्टाने सांगितलं.