Operation Sindoor: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर आता पुढे काय याकडे जगभरातील राजधान्यांचे बारीक लक्ष आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ते 17 मे पर्यंत नॉर्वे, नेदरलँड आणि क्रोएशियाच्या दौऱ्यावर जाणार होते .मात्र भारत पाकिस्तानच्या तणावादरम्यान त्यांनी हा दौरा रद्द केला आहे . ऑपरेशन सिंदूरनंतर वाढणारा तणाव पाहता भारताने अमेरिका आणि चीनसह प्रमुख देशांशी राजनैतिक संपर्क वाढवला आहे .राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल ,परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी त्यांच्या अनेक समकक्ष आणि परदेशी राजदूतांशी चर्चा केली आहे. (IND vs PAK)

पुढील 24 ते 48 तासात पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असे ममुनेर यांचे पुढचे पाऊल महत्त्वाचे राहणार आहे .पाकिस्तानच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हल्ल्यांकडे रावळपिंडी कसे पाहते यावर पुढचं पाऊल ठरणार आहे .मुरीदके हे लष्कर ए तैयबाचे मुख्यालय आहे .बहावलपूर हे जैश - ए - मोहम्मदचे तळ आहे .तसेच हिजबुल मुजाहिदिन हे सियालकोटमध्ये आहे . या तीनही दहशतवादी तळावर झालेले हल्ले हे पाकिस्तानच्या रणनीतीसाठी अपमानकारक समजले जात आहे . त्यामुळे पाकिस्तानकडून सशस्त्र दलांकडून प्रत्युत्तराची शक्यता वाढत आहे .

आमचे दोन्ही देशांशी चांगले संबंध: ट्रम्प

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यांच्या संपर्कात आहे .अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आशा आहे हे सगळं लवकरच संपेल असे त्यांनी बुधवारी सांगितले .एवढेच नाही तर मी काही मदत करू शकलो तर मी तिथे असेल असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत .जेव्हा भारताने पाकिस्तानवर केलेले हल्ल्याविषयी त्यांना विचारण्यात आले, त्यावर 'हे लज्जास्पद आहे .ओव्हलच्या दरवाजातून आत जात असताना आम्हाला याबद्दल समजले .मला वाटतं लोकांनाही माहीत होतं की काहीतरी घडणार आहे .कारण भूतकाळात असं काहीतरी घडलं होतं .ते बराच काळ भांडत होते .खरे तर जर तुम्ही खरोखर विचार केला तर तुम्हाला माहित आहे की, ते किती दशके किंवा शतकांपासून लढत आहेत .आता मला आशा आहे की हे लवकर संपेल असे ते म्हणाले होते . आमचे दोन्ही देशांशी खूप चांगले संबंध आहेत .त्यामुळे हे सगळं थांबताना मला पहायचे आहे .जर काही मदत करू शकलो तर मी तिथे असेल असेही ट्रम्प म्हणाले .

भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यांच्या संपर्कात

दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्रमंत्री मार्को रुबीओ यांच्यासह चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी,रशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सर्गेई शोरगु , ब्रिटिश राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जीवनातन पॉवेल,सौदी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मुसेद अल ऐबान, संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तहानवून बिन झायेद अल नाह्यान , जपानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मसाताका ओकानो आणि फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार इमॅन्युअल बोन यांच्याशी चर्चा केली .भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईच्या कार्यपद्धतीबद्दल सांगताना तणाव वाढविण्याचा कोणताही हेतू नाही मात्र, पाकिस्तानने तणाव वाढविण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा आम्ही पूर्ण तयार आहोत,द इंडियन एक्सप्रेसला त्यांनी ही माहिती दिली . 

हेही वाचा:

Operation Sindoor : युद्धाच्या दिशेने आणखी एक पाऊल, लाहोरमधील अमेरिकन नागरिकांना हाय अलर्ट, पाकिस्तान सोडण्याच्या सूचना