Operation Sindoor: भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानातील बहवालपूरमधील दहशतवादी मसूद अझहरच्या जैश-ए- मोहम्मदचं मुख्यालय मरकज सुबहान अल्लाहवर हल्ला करत मसूद अझहरचं कंबरडं मोडलं. यात मसूद बचावला असला तरी त्याच्या कुटुंबातल्या 14 जणांचा खात्मा झाला. भारतीय लष्कराने पाकिस्तानस्थित दहशतवादी नेता मसूद अझहरच्या लपण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विनाश केला.  भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या आत 100 किमी अंतरावर असलेल्या बहावलपूरमधील जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर आणि इतर 8 तळांवर हल्ला केला. दरम्यान, कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या घरी मृतदेहाची रांग लागली आहे. पाकिस्तानातून बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त झाल्यानंतर बहावलपूरमधून फोटो आले आहेत. (Ind vs Pak)

भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लष्करी कारवाईत पाकिस्तानचा कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. भारताच्या हवाई हल्ल्यात, जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी अझहरच्या कुटुंबातील 10 सदस्य ठार झाले आहेत. तर त्याचे चार साथीदारही मारले गेले आहेत. 

हे छायाचित्र पाकिस्तानातील बहावलपूर येथील आहे. यामध्ये, क्षेपणास्त्र हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना घेऊन एक रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचताना दिसत आहे. जैश-ए-मोहम्मदने एक निवेदन जारी करून या घटनेची पुष्टी केली आहे. हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अझहरच्या कुटुंबातील सदस्यांना आणि जवळच्या व्यक्तींना आज दफन करण्यात येईल. मसूद अझहर हा भारत आणि जगातील सर्वात वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे.

या हवाई हल्ल्यात दहशतवाद्यांनी ज्या मशिदीत लपून बसले होते ती मशीदही उडवून देण्यात आलीय. बीबीसी व्हेरिफायने मूल्यांकन केलेल्या मशिदीच्या व्हिडिओ फुटेजमध्ये असे दिसून आले की त्याचा एक घुमट कोसळला होता आणि आत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. छताला भगदाड पडल्याचेही दिसून आले.

या हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचे विधानही  समोर आले. त्यांनी सांगितले की, भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात त्यांचे 10 नातेवाईक मृत्युमुखी पडले. मीही मेलो तर बरे होईल.असं तो म्हणालो. पाकिस्तानातील बहावलपूर येथील एका मशिदीवर झालेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरची मोठी बहीण आणि तिचा पती, त्याचा पुतण्या आणि पुतण्याची पत्नी, त्याची भाची आणि त्याच्या कुटुंबातील पाच मुले ठार झाली आहेत. 

बुधवारी रात्रभर, बहावलपूरमधील  झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांवर शोक व्यक्त करत रस्त्यांवर अंत्ययात्रा काढण्यात आल्या. पाकिस्तानी ध्वजांमध्ये गुंडाळलेल्या शवपेट्यांचे फोटोही समोर आले आहेत. 

मंगळवारी रात्री भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. हा हल्ला 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर होता. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला.

हेही वाचा:

Operation Sindoor : जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय उद्ध्वस्त, निष्पापांचा बळी घेणाऱ्या मसूद अझहरवर हिशोब देण्याची वेळ