Operation Sindoor : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा अन् त्यात गेलेल्या निष्पाप 26 जणांच्या मृत्यूचा बदला घेत भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या (Operation Sindoor) माध्यमातून दहशतवाद्यांसह पाकड्यांना अद्दल घडवली आहे. मंगळवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास (7 मे) पाकिस्तानच्या 9 दहशतवादी (India-Pakistan War) तळांवर एअर स्ट्राइक करत पहलगामच्या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत बदला घेतलाय. ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) या एअर स्ट्राइकमध्ये अनेक दहशतवादी या एअर स्ट्राइकमध्ये मारले गेले आहेत.
दरम्यान, भारतीय सैन्याने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या (Operation Sindoor) माध्यमातून केवळ दहशतवाद्यांचाच नाही तर,दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकड्यांचं ही पितळ उघडं पडलं आहे. किंबहुना भरताविषयी पाकिस्तानी सैन्याचा छुपा मनसुबा नेमका काय? हे ही आता स्वता: पाकिस्तानकडून समोर आले आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मारला गेलेला लष्कर कमांडर खालिद मुदस्सीरला पाकिस्तानी सैन्याने चक्क 'गार्ड ऑफ ऑनर' देत सन्मानित केलं आहे. पाकिस्तानी लष्कर आणि पोलिसांचे अधिकारी नमाज-ए-जनाजामध्येही सहभागी झाले आहेत. या घटनेवरून पाकिस्तानचा भारताप्रती असलेला दुटप्पीपणा नव्यानं जगापुढे आला आहे.
एका दहशतवाद्याला गार्ड ऑफ ऑनर देणे म्हणजे...
शिवाय एकीकडे स्वतःला स्वच्छ दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि दुसरीकडे आपल्या भूमीवर दहशतवाद्यांना आश्रय देण्याऱ्या या कृत्यानं जगभरात पाकिस्तानचा खरां चेहरा स्वत:पाकिस्तानी सैन्यानं पुढं आणला आहे. त्यामुळे भारताविरोधी भूमिका घेणाऱ्यासाठी पाकिस्तान आश्रयदाता असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दरम्यान, विश्लेषकांचा असा विश्वास आहे की "एका दहशतवाद्याला गार्ड ऑफ ऑनर देणे" म्हणजे पाकिस्तान संपूर्ण जगासमोर स्वतःला उघड करत आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट झाले होते, ज्यामुळे भारताकडून संभाव्य हल्ल्यांची भीती ही दिसून आली आहे.
ऑपरेशन सिंदूर सक्सेसफूल, कोणकोणते दहशतवादी मारले गेले?
- लश्कर-ए-तैयबाचा महत्वाचा कमांडर खालिद मोहम्मद आलम या हल्ल्यात मारला गेला आहे. - धर्मांध इस्लामिक धर्मप्रसारक आणि कोटली दहशतवादी शिबिराचा मुख्य कमांडर कारी मोहम्मद इकबाल मारला गेला आहे. - हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मौलाना मसूद अजहर याचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगर गंभीररित्या जखमी- मौलाना मसूद अजहर याचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगरच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. - भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगरचा मुलगा हुजैफा यांचा मृत्यू झाला आहे.- याशिवाय मौलाना मसूद अजहर याच्या परिवारातील एकूण १४ लोकांचा मृत्यू झाला आहे.- लष्कर ए तय्यबाचे दहशतवादी वकास आणि हसन यांनाही कंठस्नान घालण्यात आलंय.- लष्कर ए तय्यबाचा मोस्ट वॉन्टेड अब्दुल मलिक आणि मुदस्सिर यांचा खात्मा केला आहे.
आणखी वाचा
भारताकडून एअर स्ट्राईक; पाकिस्तानचा सच्चा मित्र म्हणून ओळख असणारा चीन भडकला, म्हणाला...