मुस्लीमबहुल देशातील निर्वासितांना अमेरिकेत नो एंट्री : ट्रम्प
हाफिजला लाहोरमधील चौबुर्ली येथील त्याच्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं असल्याचं वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिलं आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जमात-उद-दावा यांसारख्या संघटनांविरोधात असल्याने पाक सरकारने दबावाने ही कारवाई केली असल्याची माहिती आहे.
डोनाल्ड ट्रम्प आता पाकिस्तानवरही बंदी घालणार?
पंजाब प्रांताच्या गृह विभागाने हाफिजला नजरकैद केल्याचं बोललं जात आहे. यापूर्वीही पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली खान यांनी 2011 पासूनच 'जमात-उद-दावा'वर नजर असल्याचं म्हटलं होतं.
इराणचं अमेरिकेला जशास तसं उत्तर, अमेरिकन नागरिकांना इराणमध्ये 'नो एंट्री'
अमेरिकेच्या दबावानंतर पाकने ही कारवाई केली असावी, असा अंदाज लावला जात आहे. कारण अमेरिकेने 7 मुस्लीमबहुल देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली आहे. त्यातच आता पाकिस्तानी नागरिकांवरही बंदी घालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पाकने अमेरिकेच्या दबावातून हे पाऊल उचललं असावं, असं बोललं जात आहे.