सोल : उत्तर कोरियाने आपला स्थापना दिवस काल मोठ्या उत्साहात साजरा केला. उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमाने अण्वस्त्रांच्या निर्मितीचं काम हाती घ्यावं, असं देशाला आवाहन केलं. उत्तर कोरियाच्या या युद्धखोर भूमिकेचा जगभरातून निषेध होत आहे.

रोदोंग सिनमन या वृत्तपत्राने आपल्या देशाच्या सामर्थ्याचं दर्शन जगाला करुन देण्यासंदर्भात विशेष संपादकीय प्रकाशित केलं आहे. यात, ''संरक्षण पद्धतीमध्ये पक्षाची ब्यूंगजिन नीति (एकाचवेळी अर्थव्यवस्था आणि अण्वस्त्रांची निर्मिती करणं) सोबतच 'जूचे' शस्त्रांस्त्रांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली,'' पाहिजे असं म्हटलं आहे. तसेच अमेरिकेला थोपवण्यासाठी दोन आयसीबीएम परिक्षणासारखे कार्यक्रम पुन्हा हाती घेण्याची मागणी केली आहे.

संपादकीयमध्ये म्हटलंय की, ''जोपर्यंत अमेरिका उत्तर कोरियाकडे शत्रूत्वाचं धोरण अवलंबणं बंद करत नाही, तोपर्यंत त्यांना वेगवेगळ्या भेटवस्तू द्यायलाच पाहिजेत. किम जोंग यांनीही आयसीबीएम परिक्षणाला उत्तर कोरियाकडून अमेरिकेला दिलेली भेटवस्तू असल्याचं सांगितलं होतं.''

दुसरीकडे दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने सांगितलंय की, ''उत्तर कोरियाकडून शनिवारी कोणत्याही प्रकारचं मिसाईल परिक्षण घेतलं नाही. पण उत्तर कोरिया कधीही मोबाईल लॉन्चरच्या माध्यमातून बॅलिस्टिक मिसाईलचा हल्ला करु शकतो. जे लपवण्यास अतिशय सोपे आहेत.''

दरम्यान, उत्तर कोरियाने गेल्या वर्षी 9 सप्टेंबर रोजी पाचव्यांदा अण्वस्त्र परिक्षण केलं होतं. तर गेल्याच आठवड्यात सहाव्यांदा अण्वस्त्र परिक्षण केलं. पण हे अण्वस्त्र नसून, हायड्रोजन बॉम्ब असल्याचा दावा केला जात आहे.

उत्तर कोरियांच्या या कुरापतींचा जगभरातून निषेध व्यक्त होत असून, त्यांच्या विरोधातील प्रतिबंध अजून कडक करण्याचं आवाहन जगभरातून होत आहे.

संबंधित बातम्या

...त्या माध्यमातून अमेरिकेला भेटवस्तू दिली, उत्तर कोरियाची धमकी


उत्तर कोरियाच्या किम जोंगचे 20 क्रूर कारनामे


उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची चाचणी, जगात चिंतेचं वातावरण


…तर परिणाम भोगायला तयार राहा : डोनाल्ड ट्रम्प


उत्तर कोरियाने जपानवरुन मिसाईल सोडलं, दोन्ही देशात तणाव


उत्तर कोरियासंदर्भातील ट्विटवरुन चिनी मीडियाची ट्रम्प प्रशासनावर आगपाखड


उत्तर कोरिया: बैठकीत लागली डुलकी, संरक्षण मंत्र्याना धाडलं यमसदनी!