उत्तर कोरियाने पुन्हा एकदा मिसाईल चाचणी केली आहे. यावेळी उत्तर कोरियाने हे मिसाईल थेट जपानच्या भूमीवरुन सोडल्याचं सांगण्यात येत आहे.
उत्तर जपानमधून हे मिसाईल प्रशांत महासागरात कोसळल्याचा दावा जपान सरकारचा आहे.
महत्वाचं म्हणजे दुसऱ्या देशाच्या भूभागावरुन मिसाईलचं परीक्षण करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे.
यापूर्वी उत्तर कोरियाच्या मिसाईल चाचण्या दुसऱ्या देशाच्या भूभागावरुन झाल्या नव्हत्या. या चाचणीमुळे जपान आणि उत्तर कोरियामध्ये तणाव निर्माण झाला आहे.
या मिसाईलने जपानच्या उत्तरेकडून तीन हजार किमी अंतर पार केलं. यादरम्यान मिसाईल क्षेत्रात येणाऱ्या जपानी नागरिकांना सायरन वाजवून सावध करण्यात आलं. एखाद्या सुरक्षित जाण्याचा सल्ला यावेळी नागरिकांना देण्यात आला.
जपानच्या स्थानिक माध्यमांच्या माहितीप्रमाणे समुद्रात कोसळण्याआधी मिसाईलचे 3 तुकडे झाले.
या घटनेनंतर जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी मुख्य सचिवांची तातडीची बैठक बोलावली. तसंच अशा पद्धतीचं मिसाईल परीक्षण देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोठा धोका असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियानं अमेरिकेतल्या अनेक शहरांना निशाणा बनवू शकणाऱ्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइलची यशस्वीरित्या चाचणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे गांभिर्यानं पाहिलं जातंय.