उद्धव ठाकरेंनाही अमेरिकेला बोलावण्याचा प्लॅन होता : हेडली
मुंबईवरील 26/11 हल्ला प्रकरणात पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक आणि लष्कर ए तोयबाचा अधिकारी डेविड कोलमन हेडलीला अमेरिकेत अटक झाली होती. तपासादरम्यान त्याने पाकिस्तानी लष्करी अधिकारी मेजर अब्दुल रहमान पाशा आणि मेजर इक्बाल अशी नावं घेतली होती. तसंच साजीद मीर नावाच्या पाकिस्तानी इसमाचंही नाव तपासात पुढे आलं होतं.
लष्कर-ए-तोयबाने बाळासाहेबांवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता : हेडली
डेव्हिड कोलमन हेडलीने यापूर्वीही अनेक गौप्यस्फोट केले आहेत. यात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना भवन टार्गेटवर असल्याची कबुली त्याने दिली होती. यासाठी राजाराम रेगेंशी मैत्री केली आणि शिवसेना भवनात प्रवेश केल्याचा दावाही त्याने केला. तसंच इशरत जहाँ लष्कर ए तोयबाची हस्तक होती असा गौप्यस्फोटही त्याने केला होता.