स्वीडन : वैद्यकशास्त्र आणि भौतिकशास्त्रातील नोबेलनंतर आता रसायनशास्त्रातील नोबेलही जाहीर झाला आहे. स्वीस संशोधक जॅक्स डबॉच आणि अमेरिकन संशोधक जोचिम फ्रँक, रिचर्ड हँडरसन यांना यंदा रसायनशास्त्रातील नोबेलने गौरवण्यात आले आहे.

जैव रेणूंच्या इमेजिंगमध्ये अधिक स्पष्टता येण्यासाठी क्रायो-इलेक्ट्रॉन मायक्रोस्कॉपी विकसित करण्यात जॅक्स डबॉच, जोचिम फ्रँक आणि रिचर्ड हँडरसन यांचा अमूल्य योगदान आहे.

जॅक्स डबॉच, जोचिम फ्रँक आणि रिचर्ड हँडरसन यांच्या संशोधनामुळे जीवरसायनशास्त्रात नव्या युगाला प्रारंभ झाला, असे रॉयल स्वीडीश अकॅडेमी ऑफ सायन्सने गौरव पत्रकात म्हटलंय.

5 ऑक्टोबरला साहित्यातील नोबेल, दर 6 ऑक्टोबरला शांततेचा नोबल जाहीर केला जाणार आहे. शांततेचा नोबेलने कुणाचा गौरव होतो, याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे.

https://twitter.com/NobelPrize/status/915513825591533568