Salman Rushdie May Get Nobel Prize : सुप्रसिद्ध लेखक आणि बुकर पारितोषिक विजेते ज्येष्ठ साहित्यिक सलमान रश्दी (Salman Rushdie) हे 2022 च्या  साहित्यातील नोबेल पारितोषिकाचे  (Nobel Prize for Literature) प्रबळ दावेदार आहेत. या वर्षीच्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांच्या नावाला पसंती असल्याची माहिती समोर आली आहे.  मीडिया रिपोर्टनुसार या पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची चर्चा आहे. 


सलमान रश्दी यांचा जन्म मुंबईतील एका मुस्लिम कुटुंबात झाला आहे. रश्दी यांचे बालपण हे मुंबईत गेले. सलमान रश्दी यांनी अनेक वादग्रस्त पुस्तके लिहिली. The Satanic Verses हे पुस्तक चर्चेत राहिले हे. ऑगस्ट महिन्यात न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर हल्ला झाला त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले. या वर्षीच्या साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा गुरूवारी (6 ऑक्टोबर) होणार आहे. हा पुरस्कर साहित्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींन देण्यात येतो. 
 
The Satanic Verses या पुस्तकावर इराणमध्ये 1988 पासून बंदी घालण्यात आली आहे. या पुस्तकातून रश्दींनी मुस्लिमांच्या भावाना दाखवल्यांचा त्यांच्यावर आरोप आहेत. The Satanic Verses या पुस्तकाला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सलमान रश्दी यांनी 14 पुस्तकं लिहिली आहेत. ग्रिमस, मिडनाईट्स चिल्ड्रन, शेम, The Satanic Verses, हारून एंड द सी ऑफ स्टोरीज, द मूर्स लास्ट सिघ, द ग्राऊंड बिनिथ हर फीट फ्यूरी, शालीमार द क्लाऊन, द एनचेंट्रेस गोल्डन हाऊस आणि क्विचोटे ही त्यांची महत्त्वाची पुस्तके आहे. त्यांना त्यांच्या मिडनाईट चिल्ड्रन या पुस्कासाठी इंटरनॅशनल बुकर पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे


नोबेल समितीकडून अजून नोबेल साहित्य पुरस्कारासाठी नावाची घोषणा केलेली नाही.याबाबत माध्यमे किंवा सदस्यांनाही याबाबत माहिती दिलेली नाही. पुरस्कार जिंकण्याच्या दावेदारांपैकी त्यांच्या नावाची चर्चा आहेत.  3 ऑक्टोबरपासून नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यास सुरुवात झाली. सोमवारी वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार स्वीडनच्या स्वांते पाबो यांना देण्यात येणार आहे. तर मंगळवारी भौतिक शास्त्राच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. हा पुरस्कार रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने अॅलेन अॅस्पेक्ट, जॉन एफ क्लॉझर  आणि अँटोन झेलिंगर यांना जाहीर करण्यात आला आहे. तर बुधवारी रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने कॅरोलिन आर. बर्टोझी , मॉर्टन मेल्डल  आणि के. बॅरी शार्पलेस यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :